तुम्ही ती ‘Men Will Be Men’ची जाहिरात पाहिली असेल ना? पाहिली असेल तर तुम्हाला नक्कीच माहित असेल की यात पुरुषांना स्त्रियांसाठी वाटणाऱ्या आकर्षणाला मजेशीर पद्धतीने हायलाईट केले आहे. त्या व्हिडिओमध्ये एका सुंदर स्त्रिकडे पुरुष वळून पाहतात. एखाद्या व्यक्तीला दुसऱ्या व्यक्तीबद्दल आकर्षण वाटणे ही नैसर्गिक गोष्ट आहे मग तो माणूस असो किंवा प्राणी. प्राण्यांमध्येही आकर्षण हे असतं. याचीच प्रचिती देणारा एक मजेशीर व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक कुत्रा रस्त्यावरून जाणाऱ्या दुसऱ्या कुत्रीकडे पाहत असतो आणि पुढे जे घडते ते पाहून तुम्हाला हसू आवरता येणार नाही.
पाळीव कुत्र्याचा मजेशीर व्हिडिओ
व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की काहीजण आपल्या पाळीव कुत्र्यांना घेऊन रस्त्यावर चालताना दिसत आहे. व्हिडिओमध्ये एका महिलेच्या हातात एक कुत्री आहे आणि तिच्या समोर दोन कुत्र्यांसह दुसरी महिला रस्ता ओलांडत आहेत. तिच्या हातात एका कुत्र्याचा पट्टा आहे आणि दुसरा (husky) कुत्रा पट्टयाशिवाय तिच्याबरोबर चालत आहे. दरम्यान हा दुसरा कुत्रा (husky) समोरून येणाऱ्या कुत्रीकडे बघत रस्ता ओलांडत असतो. तो तिला बघण्यात इतका हरवून जातो ती रस्ता ओलांडल्यानंतर तो तिथे असलेल्या दगडाला जाऊन धडकतो.
हा व्हिडीओ पाहून सर्वांना हसू येत आहे. दरम्यान हा व्हिडीओ bad_guy_writes या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केलेला आहे व्हिडीओवर Men Will men in Husky Version असे कॅप्शन दिले आहे. दरम्यान नेटकऱ्यांना हा व्हिडीओ प्रचंड आवडला आहे आणि एका पेक्षा एक भन्नाट प्रतिक्रिया त्यांनी दिल्या आहेत. काही लोक सांगत आहेत ते हा व्हिडिओ पुन्हा पुन्हा बघत आहेत तर एकाने कॅप्शनमध्ये Dog Will Be Dog असे लिहिले आहेत. तर तिसऱ्याने म्हटले की, भाऊ तिच्या सौंदर्याने थक्क झाला वाटतं. तर चौथ्याने लिहले,’लड़की का चक्कर बाबू भैया’
तुम्हाला हा व्हिडीओ कसा वाटला?