माणूस माणसांशीच स्वार्थी भावनेतून वागायला लागला आहे. तर प्राण्यांशी तो माणुसकीनं वागेल ही अपक्षेता तर फार दूर आहे. अनेकदा विनाकारण मुक्या प्राण्याना त्रास देणाऱ्या व्यक्तींचे सोशल मीडियावरून व्हिडीओ समोर आले आहेत. आता मात्र एका प्राण्याने माणसांसाठी दाखवलेल्या माणूसकीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होऊ लागलाय. या व्हिडीओमध्ये एका कुत्र्याने शाळेत निघालेल्या लहान मुलांना रस्ता ओलांडण्यासाठी मदत केल्याचं दिसून येतंय. या व्हायरल व्हिडीओमधल्या कुत्र्याने लाखो लोकांची मने जिंकून घेतली आहेत. सोशल मीडियावरील या कुत्र्याची जोरदार चर्चा सुरू असून तो रातोराट स्टार बनलाय.
कुत्रा हा सर्वांत प्रामाणिक पाळीव प्राणी आहे, असं म्हटलं जातं. कुत्र्यांना नेहमीच सर्वात हुशार आणि माणसाच्या सर्वांत जवळचे प्राणी मानलं गेलं आहे. घराचं रक्षण करण्यापासून प्रामाणिकपणा, मैत्री आणि मालकांचं संरक्षण करण्याचं काम कुत्रे करतात. एकदा एखाद्या व्यक्तीला जवळचं मानलं की कुत्रे त्यांच्यासाठी काहीही करतात. याचाच प्रत्यय देणारा हा व्हिडीओ सध्या मोठ्या प्रमाणात पाहिला जातोय.
या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, रस्त्याच्या फूटपाथवरून काही शाळकरी मुलांचा समूह चालताना दिसतोय. सर्व लहान मुलं रांगेत एकमेकांच्या हातात हात घेऊन रस्ता ओलांडण्यासाठी पुढे येतात. पण रस्त्यावर गाड्यांची ये-जा सुरूच असते. त्यामुळे या मुलांना रस्ता ओलांडता येत नव्हता. मग एक कुत्रा रस्त्यावरच्या गाड्या थांबवण्यासाठी धावतो. जोरजोरात भुंकत हा कुत्रा रस्त्यावरच्या गाड्या थांबवतो. त्याला पाहून मागून येणाऱ्या सर्व गाड्या जागीच थांबतात. हे पाहून सर्व शाळकरी मुलं रांगेत रस्ता ओलांडू लागतात. जोपर्यंत सर्व शाळकरी मुलांचा रस्ता ओलांडून होत नाही, तोपर्यंत तो कुत्रा क्रॉसिंग गार्ड म्हणून काम करताना दिसतो. सर्व मुलांनी रस्ता ओलांडून पुढे गेल्यानंतर तो कुत्रा जागचा हलतो आणि मग मुलांसोबत पुढे निघून जातो.
आणखी वाचा : VIRAL VIDEO : दारा घाट ओलांडणाऱ्या एक्स्प्रेस ट्रेनचे विहंगम दृश्य एकदा पाहाच, तुमचे मन प्रसन्न होईल
हा व्हिडीओ आयएएस अधिकारी अवनीश शरण यांनी त्यांच्या ट्विटर अकाउंटवरून शेअर केला आहे. या व्हिडीओमधले मूळ फुटेज Beqa Tsinadze ने कॅप्चर केले होते. त्यानंतर हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होऊ लागला. या कुत्र्याला व्हिडीओमधील लहान मुलं ‘कुपाटा’ नावाने हाक मारत असतात.
इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :
आणखी वाचा : कर्माचे फळ किती लवकर मिळते? गाढवाला लाथा-बुक्क्यांनी मारणाऱ्या व्यक्तीचा हा VIRAL VIDEO तुम्हाला सांगेल
सोशल मीडियावर हा व्हिडीओ तुफान चर्चेचा विषय बनला आहे. हा व्हिडीओ जॉर्जिया मधल्या बटुमीमधला आहे. लहान मुलांना मदत करणाऱ्या कुत्र्यांचं सर्वत्र कौतुक करण्यात येतंय. हा व्हिडीओ लोकांना इतका आवडू लागलाय की आतापर्यंत या व्हिडीओला १ लाख ९७ हजारांपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. तर ९ हजारांपेक्षा जास्त लोकांनी या व्हिडीओला लाईक केलंय. हा व्हिडीओ पाहून काही युझर्सही म्हणाले आहेत की माणुसकी यांच्याकडून शिकायला हवी. माणसाने माणुसकी सोडली मात्र या प्राण्यांनी आपला धर्म सोडला नाही.