Viral Video : सोशल मीडियावर प्राण्यांचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. अनेक युजर्स आपल्या पाळीव प्राण्यांचे व्हिडीओ शेअर करत असतात. विशेषत:कुत्र्याचे आपण अनेक व्हिडीओ पाहिले असतील कारण कुत्रा हा माणसाच्या खूप जवळच्या प्राणी आहे. माणसाचा प्रिय व्यक्ती आणि चांगला मित्र म्हणून कुत्रा ओळखला जातो.त्यामुळे कुत्र्यासंदर्भातील कोणतेही व्हिडीओ पाहून कोणीही भावूक होतात
सध्या असाच कुत्र्यांचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये चार- पाच कुत्रे थंडीला घाबरुन शेकोटीसमोर बसलेले दिसत आहे.त्यांचा हा व्हिडीओ पाहून तुम्हीही भावूक व्हाल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

[quiziframe id=19 dheight=282px mheight=417px

सध्या कडाक्याची थंडी पडली आहे. अशात थंडीपासून वाचण्यासाठी अनेक जण घराबाहेर पडत नाही पण विचार करा आपल्याला एवढी थंडी लागते मग मुक्या प्राण्यांचे काय हाल होणार? त्यांच्या अंगावर तर कपडे सुद्धा नसतात. त्यांना मग किती थंडी लागत असावी, याचा विचार आपण कधी केला आहे का? हा व्हिडीओ पाहून अनेकांच्या अंगावर काटा येईल. कुडकुडणाऱ्या थंडीत उबदारपणा मिळावा म्हणून हे पाच कुत्रे एकमेकांना घट्ट पकडून शेकोटी समोर बसलेले दिसत आहे.

हा व्हायरल व्हिडीओ एका रस्त्यावरील आहे. रस्त्यावर धुके पसरलेली दिसत आहे आणि रस्त्याच्या शेजारी शेकोटी पेटवलेली दिसत आहे. या शेकोटीसमोर एकही माणूस नाही तर चक्क पाच कुत्रे बसलेली दिसत आहे. ती थंडीमुळे थरथर कापताना दिसत आहे. एमकेकांना घट्ट पकडून बसलेली ही कुत्रे शेकोटीपासून ऊब घेण्याचा प्रयत्न करत आहे. त्यांचा हा व्हिडीओ पाहून अनेकांना त्यांची दया येईल तर काहींना त्यांच्या कुत्र्यांची आठवण येईल.
थंडीच्या दिवसांमध्ये प्राण्यांना खूप थंडी लागते अशा वेळी तुमच्या घरातील पाळीव प्राण्यांना स्वेटर घालून घ्या . त्यांच्या अंगावर चादर घाला ज्यामुळे त्यांना थंडी लागणार नाही.

हेही वाचा : चिमुकली स्वतःच्याच सावलीकडे बघून घाबरली अन् पळत सुटली, पाहा मजेशीर व्हिडीओ

pankaj_music_uk15 या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “मुक्या प्राण्यांवर थोडी दया दाखवा” तर एका युजरने लिहिलेय, “शेकोटी पेटवून खूप चांगले काम केले” आणखी एका युजरने लिहिलेय, “हिवाळ्यात मुक्या जीवांना थंडी लागू नये म्हणून काहीतरी केले पाहिजे.”