Shocking video: कुत्र्यांच्या हल्ल्याच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होतं आहे. गेल्या काही दिवसांपासून भटक्या कुत्र्यांनी उच्छाद मांडला आहे. गाडीवर जाणाऱ्यांचा पाठलाग असो, किंवा रस्त्यावरून जात असाल तरीही भटके कुत्रे हे टोळीने हल्ला करत आहे. शांतता असेल आणि एखादी व्यक्ती किंवा लहान मुलं एकटी असली की कुत्रे त्यांचेच राज्य असल्याप्रमाणे हल्ला करतात. यात आजवर अनेक नागरिक जखमी झाले आहेत. वाघ बकरी ग्रुपचे कार्यकारी संचालक पराग देसाई यांचे भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यापासून जीव वाचवताना ते पडले व त्यांच्या डोक्याला मार लागला होता, त्यानंतर उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. दरम्यान ठाण्यातून कुत्र्यांच्या हल्ल्याची अशीच एक घटना समोर आली आहे, या घटनेत काही भटक्या कुत्र्यायंनी एका चिमुकलीवर हल्ला करण्याचा प्रयत्न केल्याचं दिसतं. याचा व्हिडीओही सध्या व्हायरल झाला आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा