बिबट्या हा शिकारी प्राणी आहे तर कुत्रा हा रक्षक आणि पाळीव प्राणी आहे. कुत्रा मानवी वस्तीमध्ये फक्त राहताच नाही तर त्यांची राखणही करतो म्हणूनच कुत्रा हा माणसाचा मित्र आहे असे म्हणतात. पण बिबट्या मानवी वस्तीत शिरतो अन् शिकार करतो त्यामुळे माणसांमध्ये त्याची दहशत असते. जेव्हा बिबट्या आणि कुत्रा दोघांचा सामना होतो तेव्हा जे काही घडेल जे धक्कादायक असू शकते. अनेकांना वाटेल की, बिबट्या अन् कुत्र्याचा सामना झाला तर बिबट्या कुत्र्याची शिकार करून पसार होईल. अनेकदा असेच घडते ही पण नेहमी असे घडेल असे नाही. नुकताच बिबट्या आणि कुत्र्याचा एक व्हिडिओ समोर आला आहे जो खरंतर सर्वांना थक्क करणारा आहे.

व्हायरल व्हिडीओमध्ये एका बिबट्या मानवीवस्तीत भटकता दिसतो पण जेव्हा कुत्रा जोरदार आवाजात भुंकतो तेव्हा जे घडते ते पाहून अनेकांना आपले हसू आवरणे कठीण होत आहे. कुत्र्याचे भुंकण्याचा आवाज ऐकून बिबट्या फक्त घाबरत नाही तर धुम
ठोकून पळून जातो असे व्हायरल व्हिडीओमध्ये दिसते आहे.

व्हायरल व्हिडीओमध्ये बिबट्या पुढे जात असताना उपस्थित असलेल्या एका कुत्र्याने काहीतरी अनपेक्षित केले ज्यामुळे बिबट्या पळून गेला. हा व्हिडिओ रणथंबोर राष्ट्रीय उद्यानाच्या पेज (@ranthamboresome) द्वारे इंस्टाग्रामवर शेअर केला गेला आहे आणि तो 35 लाखांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे.


व्हिडिओमध्ये, एक बिबट्या चोरट्याने पावलांनी घरात घुसताना आणि पायऱ्यांकडे जाताना दिसतो, तेव्हा अचानक, जवळ लपलेला एक कुत्रा जोरात भुंकत बाहेर उडी मारतो. घाबरलेला, बिबट्या मागे उडी मारतो आणि घाबरून घराबाहेर पडतो. धुम ठोकून पळून जातो.

कुत्र्याला पाहून बिबट्याने घाबरून पळाल्याचे पाहून इंटरनेट वापरकर्त्यांना खूप आनंद झाला. व्हिडिओ व्हायरल होताच लोकांनी उत्साहाने प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली. एका वापरकर्त्याने कमेंट केली, ‘हा कुत्रा आता त्याच्या शेजारच्या टोळीचा हिरो आहे.’ दुसऱ्याने म्हटले, ‘कुत्र्याने आश्चर्यचकित करणाऱ्या घटकाचा पुरेपूर फायदा घेतला.’

दरम्यान, दुसऱ्या कोणीतरी लिहिले की, ‘जर बिबट्याने आवाज कुठून येत आहे हे आधी पाहिले असते तर तो कुत्रा आता जिवंत नसता.’ दुसऱ्याने विनोद केला, ‘बिबट्या मागे वळून न पाहता पळून गेला, जणू काही शाळेत उशिरा पोहोचलेल्या विद्यार्थ्यासारखा.’

आणखी एकाने कमेंट केली की, “क्या Leopard बनेगा रे तू?”(काय बिबट्या होणार रे तू)

मजेची गोष्ट म्हणजे, असेच व्हिडिओ यापूर्वीही समोर आले आहेत, ज्यामध्ये लहान कुत्रे मोठ्या वन्य प्राण्यांना आश्चर्यचकित करताना किंवा पळवून लावताना दिसतात आहेत.