गेल्या काही काळापासून भटक्या कुत्र्याच्या हल्ल्याच्या घटना वारंवार घटत असतात. काही कारण नसताना अनेकदा कुत्रे लोकांवर हल्ला करतात. अनेकदा कुत्रे टोळीने हल्ला करताना दिसतात ज्यामुळे लोकांना घराबाहेर पडतानाही भीती वाटते. सोशल मीडियावर अशा हल्ल्यांचे अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. सोशल मीडियावर अशाच एका घटनेचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये एका कुत्र्याच्या टोळीने पार्कमध्ये खेळणाऱ्या चिमुकल्यांवर हल्ला केला आहे. व्हिडिओ पाहून काळजाचा थरकाप उडत आहे.
व्हायरल व्हिडिओ @chude__ नावाच्या इंस्टाग्राम पेजवर व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडिओ एका सोसायटीमधील मुलांच्या पार्कमधील आहे जिथे काही लहान मुले घसरगुंडीवर खेळताना दिसत आहे. अचानक तिथे आलेल्या कुत्र्यांच्या टोळीने हल्ला केला आहे. एका चिमुकल्याचा पाय एका कुत्र्याने आपल्या जबड्यात पकडला जे पाहून सर्वांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले. लहान मुले तेथून धावत सुटले. चिमुकल्याचा आरडा-ओरडा ऐकून लोक जमा झाले आणि चिमुकल्याला वाचण्याचा प्रयत्न करतो. पण कुत्रा काही केल्या चिमुकल्याला आजिबात सोडत नाही. चिमुकला जीवाच्या आकांताने ओरडताना दिसत आहे. एक महिला चिमुकल्याला वाचवण्यासाठी कुत्र्यांना दगड मारताना दिसत आहे. काळाजात धडकी भरवणारा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल आहे. व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.
https://twitter.com/chude__/status/1865478025397027084/
व्हिडीओवर कमेंट करताना एकाने कमेंट केली की, “मी माझ्या आयुष्यात पाहिलेले हे सर्वात निरुपयोगी आणि मूर्ख प्रौढ आहेत. हा कसला मूर्खपणा आहे…
एका कुत्र्याला चार प्रौढ कसे बघू शकतील?”