एखादं लग्न म्हटलं की त्यात हळदीचा समारंभ, पाहुण्यांचे स्वागत, संगीत, नवऱ्याची एन्ट्री, लग्नसोहळा आणि नंतर पाठवणी अशा सर्व प्रथा पाहायला मिळतात. पण जर आम्ही तुम्हाला सांगितलं की एका कुत्र्याने पारंपारिक रितीरिवाजानुसार लग्न केले तर तुमचा यावर विश्वास बसेल का? कदाचित नाही… पण हे खरे आहे. होय, हरियाणातील गुरुग्राममध्ये एका कुटुंबाने आपल्या पाळीव कुत्र्याचे मोठ्या थाटामाटात लग्न लावले आहे. एवढंच नाही तर या लग्नासाठी त्यांनी शेजारील १०० लोकांना निमंत्रित देखील केले होते आणि ते सर्वजण लग्नाला हजर होते.
या लग्नासाठी कार्ड देखील छापण्यात आले होते. घर पूर्णपणे सजवले होते. मंडपही बांधण्यात आला होता. गाणी देखील लावण्यात आली होती आणि लोक त्यावर नाचतही होते. यावेळी कुत्र्याची मालकीण सविता खूपच भावूक झाल्या. एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना त्या म्हणाली, ‘मी एक पाळीव प्राणी प्रेमी आहे. आम्ही पाळीव प्राण्यांची काळजी घेतो. मला मुलबाळ नाही म्हणून स्वीटी म्हणजेच ही कुत्री आमचे मूल आहे. ३ वर्षांपूर्वी ती आमच्याकडे आली, आम्ही तिचे नाव स्वीटी ठेवले.
( हे ही वाचा: ट्रेनच्या अप्पर सीटवरून खाली येण्यासाठी लहान बाळाची ‘निंजा टेक्निक’, रेल्वेने प्रवास करणाऱ्यांनो ‘हा’ Video एकदा बघाच)
स्वीटीने शेरूशी लग्न केले आहे. त्या पुढे म्हणाला, ‘प्रत्येकजण म्हणायचे की आपण स्वीटीचे लग्न करूया. त्यावर आमची चर्चा झाली आणि अखेर अवघ्या चार दिवसांत एक कार्यक्रम झाला. यावेळी आम्ही सर्व विधी करायचे असे ठरवले. शेरूची मालकीण मनिता म्हणाली, ‘गेल्या आठ वर्षांपासून आम्ही शेरूसोबत आहोत. आपण त्याला नेहमीच आपल्या मुलाप्रमाणे वागवले आहे. आम्ही आमच्या कुत्र्यांचे लग्न करण्याबद्दल आमच्या शेजाऱ्यांशी सहज चर्चा केली होती पण नंतर आम्ही अचानक याबद्दल गंभीर झालो.
( हे ही वाचा: Video: फिल्मी स्टाईल प्रपोज करायला गेला अन् तोंडावर पडला, तरुणीने पायाने केलेली ‘ही’ चूक पडली महागात)
हाच आमचा आनंद आहे…
मनिता पुढे म्हणाली, ‘आम्ही जवळपास १०० लोकांना आमंत्रित केले होते. आम्ही २५ कार्डे छापली होती आणि बाकीच्यांसाठी ऑनलाइन आमंत्रण दिले होते. सविता म्हणाली, “लोक म्हणायचे की पोलीस आम्हाला उचलून तुरुंगात टाकतील, पण आम्हाला त्याची पर्वा नव्हती. आम्हाला कोणी मुलंबाळं नसल्याने हाच आमचा आनंद आहे. म्हणूनच आज माझा नवरा आनंदी आहे कारण आपण स्वीटीचे लग्न लावत आहोत.
स्वीटी ही आमच्या आयुष्याचा एक भाग आहे…
स्वीटीचा मालक राजा लग्नाच्या वेळी भावूक झाला. तो म्हणाला, ‘मी मंदिरात जायचो कारण आम्हाला मूल नव्हते. त्यामुळे आम्ही पाळीव प्राण्यांची काळजी घेऊ लागलो. गेल्या तीन वर्षांपासून स्वीटी आमच्या आयुष्याचा एक भाग आहे आणि ती माझ्या मुलीसारखी आहे. आम्ही लग्नाच्या तयारीसाठी भांडी आणि साड्या खरेदी केल्या आहेत. स्वीटीचे लग्न लावून दिल्यानंतर वडील म्हणून मला वाईट वाटेल कारण मी तिला तीन वर्षे वाढवले आहे.