आयुष्यातील सर्वात सुंदर दिवस हे शाळा आणि कॉलेजमधील असतात. लेक्चर बंक करून मज्जा मस्ती करणे, मित्र-मैत्रिणींबरोबर गप्पा मारणे…अशा कित्येक गोष्टींची मज्जा फक्त याच काळात अनुभवता येते. सर्वात जास्त मज्जा तेव्हा येते जेव्हा वर्षाअखेर स्नेहसंमेलन किंवा कॉलेज फेसिव्हल सुरु होतात. विद्यार्थ्यांमध्ये एक वेगळाच उत्साह असतो. कोणी नाटकामध्ये भाग घेतो, कोणी गाणे गाते तर कोणी डान्स करतात. एकापेक्षा एक हटके डान्स बघण्याची काही मज्जा वेगळी असते. सध्या पुण्याती अशाच एक कॉलेज फेस्टिव्हलमधील डान्स व्हिडिओ चर्चेत आला आहे. व्हायरल व्हिडीओमध्ये एका मराठी गाण्यावर तरुणींनी अफलातून डान्स केला आहे. त्यांचा डान्स व्हिडिओ नेटकऱ्यांना प्रचंड आवडला आहे.

व्हायरल व्हिडिओ पुण्यातील जी एच रायसोनी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग आणि मॅनेजमेंट येथील आहे. या कॉलेजमध्ये अतरंगी हे कॉलेज फेस्टिव्हल सुरु आहे आहे. या फेस्टमध्ये सहभागी झालेल्या तरुणींचा डान्स व्हिडिओ व्हायरल होत आहे.

‘डॉल्बी वाल्या बोलव माझ्या डिजेला’ या मराठी गाण्यावर काही तरुणींनी भन्नाट डान्स केला आहे. साडी नेसून तरुणी मराठमोळ्या अंदाजामध्ये डान्स करताना दिसत आहे. डान्स करताना तरुणींची ऊर्जा आणि उत्साह हा कौतुकास्पद आहे. तरुणींच्या डान्सने नेटकऱ्यांचे मन जिंकले आहे. तरुणींचा डान्स पाहण्यासाठी कॉलेजमधील तरुण-तरुणी जमले आहेत. तरुणींनी आपल्या डान्सने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.

व्हिडिओ इंस्टाग्रामवर raisoniwaley आणि awesome__nagpur या खात्यावर पोस्ट केला आहे. व्हिडिओ पोस्ट करताना कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, “मराठी तडका” अंतरंगी(कॉलेज फेस्टिव्हल) दिवस दुसरा

व्हिडीओवर कमेंट करत नेटकऱ्यांनी तरुणींचे कौतुक केले आहे. एकाने लिहिले की,”खूपच सुंदर डान्स”

Story img Loader