सध्या सोशल मीडियावर एकाच व्यक्तीची चर्चा होत आहे. होय! तुम्ही नावाचा अंदाज बरोबर घेतला आहे. सध्या सर्वत्र डॉली चहावाल्याची चर्चा आहे. कारण- मायक्रोसॉफ्टचे सह-संस्थापक बिल गेट्स या डॉली चायवाल्याला भेटले होते. बिल गेट्स यांनी एक व्हिडीओ शेअर केला आणि त्याच व्हिडीओमुळे डॉली चहावाला भारताच्या कानाकोपऱ्यात पोहोचला. आपल्या अनोख्या अंदाजामुळे नागपूरचा डॉली चायवाला प्रसिद्ध आहे. सध्या भारत दौऱ्यावर असलेल्या प्रसिद्ध उद्योगपती बिल गेट्स यांनाही त्याच्या चहाने भुरळ घातली आहे. या व्हायरल व्हिडीओमध्ये दिसते आहे की, डॉली चहावाल्याने त्याच्या खास शैलीमध्ये बनविलेल्या चहाचा आस्वाद बिल गेट्स घेताना दिसत आहेत. आता डॉली चहावाल्याचा आणखी एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
फोटोत काय दिसते?
सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या या फोटोमुळे लोकांना धक्का बसला आहे. या व्हायरल फोटोमध्ये डॉली चायवाला कारच्या शेजारी उभा असल्याचे दिसत आहे. ही कार सामान्य कार नाही; तर लॅम्बोर्गिनीची सुपर कार आहे. @RVCJ_FB नावाच्या पेजद्वारे मायक्रो ब्लॉगिंग प्लॅटफॉर्म X (पूर्वीचे Twitter)वर पोस्ट शेअर करण्यात आली आहे. परंतु या फोटोबाबत कोणतीही माहिती पेजवर देण्यात आलेली नाही. मात्र, बिल गेट्ससोबतचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर ‘डॉली चायवाला’चे व्हिडीओ आणि फोटो सध्या व्हायरल होत आहेत.
(हे ही वाचा : कंगाल पाकिस्तानात १ लिटर पेट्रोलची किंमत किती? इंधन भरण्यासाठी गेलेल्या व्यक्तीचा ‘तो’ VIDEO होतोय तुफान व्हायरल…)
डॉली चहावाल्याची चहा विकण्याची हटके स्टाईल बिल गेट्स यांनाही आवडली. म्हणूनच नागपूरच्या डॉली चहावाल्याला थेट मायक्रोसॉफ्टच्या हैदराबादमधील ऑफिसमध्ये बोलावण्यात आले. त्याच्यासाठी खास चहाचा स्टॉलदेखील तयार करण्यात आला. डॉली चहावाल्याला त्याच्या हटके स्टाईलमध्ये चक्क बिल गेट्स यांना चहा देण्याची संधी मिळाली.
व्हायरल फोटो येथे पाहा
जिथे चहा विक्रेते दिवसभर त्यांच्या स्टॉलवर कामाच्या व्यापात अनेकदा दमलेले, दिसतात तिथे डॉलीभाई लॅम्बोर्गिनी कारबरोबर कमाल पोज देताना दिसत आहेत. डॉली चायवाल्याचा सुपर कारसोबतचा फोटो पाहून नेटकऱ्यांना फार आनंद झाला आहे. वृत्त लिहेपर्यंत सहा हजाराहून अधिक लोकांनी ही पोस्ट पाहिली आहे. पोस्ट पाहिल्यानंतर एका युजरने लिहिले, “व्वा, आतापासून फक्त चहा विकला पाहिजे.” दुसऱ्या युजरने लिहिले, “मलाही चहा विक्रेता होऊन प्रसिद्ध व्हायचं आहे.”