Viral video: नागपूरमध्ये ‘डॉली चायवाला’ म्हणून प्रसिद्ध असलेला डॉलीची सध्या संपूर्ण जगात चर्चा आहे. माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील सर्वात यशस्वी कंपन्यांपैकी एक असलेल्या मायक्रोसॉफ्ट कंपनीचे सहसंस्थापक बिल गेट्स यांचा एक व्हिडीओ सध्या तुफान व्हायरल होतोय. बिल गेट्स यांनी बुधवारी आपल्या इन्स्टाग्रामवरुन नागपूरमधील डॉली चायवाल्याचा व्हिडीओ शेअर करत भारतामध्ये प्रत्येक गोष्टीत वेगळेपणा दिसून येतो असं म्हणत भारतीयांमधील वेगळेपण शोधण्याच्या कौशल्याचं कौतुक केलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पण याप्रकरणी जेव्हा डॉली चायवाल्याला विचारलं तेव्हा त्यानं खूप चक्रावून टाकणारं उत्तर दिलं. टपरीवर चहा पिणारा व्यक्ती कोण होता हे त्याला माहितच नव्हतं असं तो सांगतो. बिल गेट्स कोण हे टीव्हीवर पाहिल्यानंतर त्याला कळलं. आता याच उत्तरामुळे एका रात्रीत प्रसिद्ध झालेला डॉली ट्रोलसुद्धा होत आहे. तसेत भविष्यात कुणाला चहा पाजण्याची इच्छा आहे असं विचारलं असता, त्यानं थेट पंतप्रधानांचं नाव घेतलंय.याचा व्हिडीओही सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

एएनआयला दिलेल्या मुलाखतीत डॉली म्हणाला, “बिल गेट्स कोण आहेत हे मला माहितच नव्हतं. माझ्या टपरीवर एक फॉरेनर आलाय आणि त्याला चांगला चहा द्यायचाय एवढंच माझ्या डोक्यात होतं. दुसऱ्या दिवशी जेव्हा मी नागपूरमध्ये आलो तेव्हा मला कळलं मी किती मोठ्या व्यक्तीला चहा पाजला आहे. लोक माझं कौतुक करत आहेत हे पाहून मला खूप भारी वाटतंय. आता येत्या काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना चहा पाजायचं माझं स्वप्न आहे.”

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> दहावीच्या परीक्षेत कॉपी करण्यासाठी विद्यार्थ्याचा देसी जुगाड; २० रुपयांच्या नोटेवर अशी लपवली उत्तरे…VIDEO पाहून चक्रावून जाल

कोण आहे हा डॉली चहावाला?

नागपूरमधील सदर परिसरातील विदर्भ क्रिकेट असोसिएशनच्या जुन्या मैदानावजळ डॉल चायवाल्याची चहाची गाडी आहे. याआधीच तो नागपूरकरांमध्ये आणि सोशल मीडियावर डॉली चायवाला म्हणून प्रसिद्ध आहे. चहा बनवताना अगदी दूध पातेल्यात ओतण्यापासून ते चहा बनवण्याच्या पद्धतीपर्यंत त्याच्या शैलीचं कौतुक होत असतं. त्यामुळे तो नेहमीच वेगवेगळ्या व्हिडीओतून व्हायरल होत असतो.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dolly chaiwala wants serving tea to pm narendra modi video viral on social media srk