Mumbai Local Uncle Viral Video: मुंबई लोकलची गर्दी ही जगात प्रसिद्ध आहे. अनेकदा दारात उभं राहून प्रसंगी लटकून जीव धोक्यात घालून मुंबईकर व उपनगरीय भागातील प्रवासी प्रवास करतात. विशेषतः पावसाळ्यात तर रेल्वेने कितीही तयारी केली तर चार थेंब पाऊस सुद्धा रेल्वेचं वेळापत्रक कोलमडून टाकू शकतो. अशावेळी गर्दीवर नियंत्रण ठेवणं हे कोणाच्याच हातात नसतं. अशाच मुंबई लोकलच्या गर्दीतील एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान चर्चेत आहे. ज्यामध्ये एक व्यक्ती मोटरमनच्या केबिनमधून प्रवास करत आहे.
काहीच दिवसांपूर्वी दिवा येथे राहणाऱ्या एका तरुणीने अशा प्रकारे मोटरमनच्या केबिनमध्ये शिरण्याचा प्रयत्न केला होता त्यावेळी साधारण दीड तास ट्रेन तशीच थांबली होती व स्थानकात तुफान भांडण झालं होतं. मग अशावेळी मोटरमनच्या केबिनमध्ये इतक्या लोकांना प्रवेश का दिला असाही प्रश्न नेटकरी करत आहेत. या व्हिडिओ संदर्भात सध्या खरी माहिती समोर येत आहे. सदर व्यक्ती कोण आहे व त्यांना कोणत्या परिस्थितीत लोकोपायलटच्या केबिनमधून प्रवास करावा लागला हे सुद्धा समजत आहे. चला तर मग या व्हिडिओची खरी बाजू जाणून घेऊया..
काय होत आहे व्हायरल?
ओम जाधव अशा इंस्टाग्राम अकाउंटवर सर्वात आधी हा व्हिडीओ शेअर करण्यात आला होता. या व्हिडिओवर १ लाख ८० हजार इतके लाईक्स होते. यानंतर आमची मुंबई या इंस्टाग्राम अकाउंटवर सुद्धा हाच व्हिडीओ शेअर झाला. यावरून अनेकांनी ही पोस्ट शेअर केली.
तपास
या व्हायरल व्हिडिओवर निकिता आयरे साळुंखे अशा अकाऊंटवरून एक कमेंट होती. ज्यामध्ये मोटरमन केबिनमधून प्रवास करणारी व्यक्ती ही स्वतः लोकोपायलट असून मागील ३८ वर्ष ते रेल्वेत कार्यरत आहेत असे सांगण्यात आले होते. “त्याचप्रमाणे इतर सामान्य काका – मामा ह्यांना आत प्रवेश नसतो. ह्याची नोंद घ्यावी. तुमच्या वरील पोस्ट मुळे आम्हाला मानसिक त्रास होत आहे. तरी तुम्ही सदर पोस्ट डिलीट करून माफी मागावी.” असेही या कमेंटमध्ये लिहिण्यात आले होते.
हे ही वाचा<< शिकलेला राजकारणी निवडण्याबाबत ‘Unacademy’ च्या शिक्षकाचा सल्ला ऐकून नेटकरी भडकले; म्हणाले, “हा मग चहा..”
निकिता यांच्याशी यासंदर्भात बोलताना असे लक्षात आले की, २० जुलैला जेव्हा तुफान पाऊस झाला होता तेव्हाच लोकोपायलट्सचे कुर्ला येथे प्रशिक्षण शिबीर होते. तिथून परत येत असताना ट्रेनला सुद्धा खूप गर्दी होती त्यामुळे अनेक मोटरमन हे डोंबिवलीकडे येणाऱ्या या ट्रेनच्या केबिनमध्ये चढले होते. संबंधित व्हिडीओ मध्ये दिसणारे प्रवासी हे स्वतः मोटारमन आहेत त्यामुळेच त्यांना केबिनमध्ये प्रवेश देण्यात आला होता.
निष्कर्ष: व्हायरल व्हिडिओमधील व्यक्ती स्वतः रेल्वे कर्मचारी आहे त्यामुळे त्यांना गर्दीच्या दिवशी मोटरमनच्या केबिनमधून प्रवासाची मुभा देण्यात आली होती. सामान्य प्रवाशांनी लोकोपायलट केबिनमधून प्रवास केल्याचे दावे चुकीचे आहेत.