Dombivli Railway Station Viral : रेल्वेने प्रवास करताना अनेकदा खूप भूक लागते. अशा वेळी आपण रेल्वेस्थानकावरील दुकानातून कुरकुरे, वेफर्स खरेदी करतो; पण पोट भरण्यासाठी म्हणून काही जण चटपटीत अशी भेळ घेतात. कांदा, मिरची, मसाला, चिवडा, शेव, कुरमुरे टाकून बनवलेली भेळ खाऊन पोट भरल्यासारखे वाटते. जर तुम्हीही अशा प्रकारे रेल्वेस्थानकावरील दुकानातील चटपटीत भेळ खात असाल, तर व्हायरल होणारा हा व्हिडीओ तुम्ही पाहाच. कारण- या व्हिडीओतून असा काही किळसवाणा प्रकार दाखविला आहे, जो पाहिल्यानंतर तुम्ही भेळ खाताना पुन्हा १०० वेळा विचार कराल. अनेकांनी हा व्हिडीओ पाहून संताप व्यक्त केला आहे.

रेल्वेस्थानकावरील खाद्यविक्रेते अनेकदा बरेचसे पदार्थ गलिच्छ पद्धतीने बनवून ते प्रवाशांना विकत असल्याचे व्हिडीओ यापूर्वी व्हायरल झाले आहेत. त्यात आता डोंबिवली रेल्वेस्थानकावरील एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. त्यात रेल्वेस्थानकावरील दुकानदार भेळ बनविण्यासाठी लागणारे कांदे चक्क अस्वच्छ गर्दुल्ल्याकडून कापून घेताना दिसत आहे. मळकटलेले कपडे, अस्वच्छ शरीर आणि शरीरारावर काहीतरी पांढरी पावडर लावून बसलेला एक गर्दुल्ला अतिशय गलिच्छपणे दुकानदाराला कांदे कापून देतोय. यावेळी व्हिडीओ बनविणाऱ्या व्यक्तीने दुकानदाराला विचारले की, गर्दुल्याला कांदे कापायला का दिले? त्यावर दुकानदाराने उडवाउडवीची उत्तरे दिली.

Aishwarya Narkar
Video: “शेवटचे एकदा…”, ऐश्वर्या नारकर यांनी कोणासाठी शेअर केली पोस्ट?
kalyan yogidham society viral video
कल्याण मारहाण प्रकरण: “तो म्हणाला मुख्यमंत्री कार्यालयातून एक…
Lakhat Ek Aamcha Dada
Video : “…तसा सूर्या तुमचा जावई”, तुळजाने केली डॅडींकडे ‘ही’ मागणी; मालिकेत पुढे काय होणार? पाहा प्रोमो
Gujarat suv car accidnet video viral
VIDEO : ढाब्यावर लोक जेवत असतानाच पाठीमागून भरधाव आली कार अन्…; थरारक लाइव्ह अपघात, सांगा चूक नक्की कुणाची?
leopard's mouth got stuck in the water pot
“लोक म्हणतात त्याला कर्माचे फळ मिळाले…”, कळशीत अडकलं बिबट्याचं तोंड अन् असं काही झालं; VIDEO पाहून नेटकरी करतायत कमेंट्स
Vasota Jungle Trek
मरणाची गर्दी! वासोटा ट्रेकला जाण्यापूर्वी हा VIDEO एकदा पाहाच
Men walking with billboard of food delivery app in Bengaluru netizens not amused by marketing campaign
मार्केटिंगसाठी काहीही! फूड डिलिव्हरी ॲपचे बिलबोर्ड घेऊन रस्त्यावर फिरत आहे पुरुष, Viral Video पाहून चक्रावले नेटकरी
pizza advertisment banned
पिझ्झा, केक आणि शीतपेयाच्या जाहिरातींवर बंदी; ‘या’ देशाने केली कारवाई, कारण काय?

रेल्वेस्थानकावरील किळसवाणा प्रकार ( Dombivli Railway Station Bhel Video)

रेल्वेस्थानकावर अनेक गर्दुल्ले गलिच्छ स्वरूपात फिरत असतात. ते नशा करण्यासाठी किंवा भूक भागविण्यासाठी म्हणून तिथेच काही ना काही काम शोधत असतात. या कामाच्या मोबदल्यात मिळणारे पैसे गर्दुल्ले नशा साहित्याची खरेदी वा जुगार यांसाठी खर्च करतात. अशा परिस्थितीत काही दुकानदार या गर्दुल्ल्यांकडून कमी मोबदल्यात लहान-मोठी कामे करून घेतात. कित्येकदा हे दुकानदार गर्दुल्ल्यांनी केलेल्या कामाच्या मोबदल्यात त्यांना पैसे देण्याऐवजी दुकानातीलच काहीतरी खायला देतात. अशाच प्रकारे डोंबिवली स्थानकावरील भेळविक्रेता एका गर्दुल्ल्याकडून भेळीसाठी लागणारे कांदे, टोमॅटो सोलून घे, कुठे काही भांडी घास, अशी कामे करून घेतो. व्हिडीओत हा भेळविक्रेता त्या गर्दुल्ल्याकडून कांदे सोलून घेत असल्याचे दिसत होते. अशा प्रकारे अगदी अस्वच्छपणे बनविलेली भेळ तुमच्या आरोग्यासाठी खूप हानिकारक ठरू शकते. त्यामुळे रेल्वेस्थानकावर काहीही खाण्यापूर्वी वा खाताना जरा विचार करा.

डोंबिवली रेल्वेस्थानकावरील या धक्कादायक घटनेचा व्हिडीओ @dinu_mohite नावाच्या अकाउंटवरून पोस्ट करण्यात आला आहे. त्याच्या कॅप्शनमध्ये लिहिले की, डोंबिवली स्थानकावर भेळ खात असाल तर सावधान! कारण- गर्दुल्ल्यांकडून कांदे कापून घेतले जातात आणि जाब विचारला, तर उडवाउडवीची उत्तरे दिली गेली. दरम्यान, अनेक युजर्सदेखील या व्हिडीओवर कमेंट्स करीत आहेत. अनेकांनी हा अतिशय गलिच्छ प्रकार असल्याचे म्हटले आहे. एका युजरने लिहिले की, अरे डोंबिवलीच नाही… कोणत्याच स्टेशनला काही खाऊ नये. सगळीकडे फक्त घाणच घाण आहे.

More Trending News Read Here ; “शिस्तीत राहा नाहीतर…” भरविमानात एअर होस्टेसची प्रवाशांना दादागिरी; Video पाहून युजर्सचा संताप

आणखी एका युजरने लिहिले की, हा बेवडा कचरा जमा करतो. महिलांच्या डब्यात चढून महिलांसमोर मुद्दाम कसेपण चाळे करतो. मी डब्यात असताना महिला पोलिसाकडे याची तक्रार केली होती. पण, त्यांनी तो वेडा आहे, असे सांगून मला, आम्ही आहोत काळजी करू नका, असं सांगितलं. रात्री-अपरात्री जेव्हा महिलांच्या डब्यात कोणी नसतं तेव्हा जर असे लोक डब्यात असे चाळे करीत असतील, तर काय करायचं? महिलाही दुर्लक्ष करतात; पण त्याला डब्यातून खाली उतरवत नाहीत. अशा बेवड्या लोकांना अजिबात उभे करू नका. कारण- ते काहीही करू शकतात आणि बाहेरचं तर अजिबातच खाऊ नका. वाटलेच तर, घरी बनवून खा. बाहेरचं खाणं आणि मुलांना देणं चांगलं नाहीये. सर्वच वडापाव दुकानांवर आणि इतर ठिकाणीही हाच प्रकार आहे.

Story img Loader