Domino’s, Employee Picks Nose Wipes Hand in Pizza Dough : वेगवेगळं टॉपिंग, सॉस आणि त्यावर चीज टाकून बनविलेला गरमागरम पिझ्झा पाहताच अनेकांच्या तोंडाला पाणी सुटतं. हल्ली अगदी लहानांपासून वृद्धांपर्यंत सगळेच पिझ्झा आवडीनं खातात. त्यामुळे पिझ्झाचे अनेक प्रकार सध्या बाजारात पाहायला मिळतात. जर तुम्हीही अगदी चवीनं पिझ्झा खात असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. कारण- सध्या सोशल मीडियावर पिझ्झा बनवितानाचा एक व्हिडीओ खूप व्हायरल होत आहे. त्यात एक कर्मचारी पिझ्झा बनविताना असा काही किळसवाणा प्रकार करतो की, जो पाहिल्यानंतर तुम्ही कदाचित आयुष्यात कधीच पिझ्झा खाणार नाही. हा व्हिडीओ ‘डॉमिनोज पिझ्झा’च्या एका आउटलेटमधील असल्याचे सांगितले जात आहे.

हे प्रकरण जपानमधील एका पिझ्झा स्टोअरमधील आहे. या व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये ‘डॉमिनोज’चा कर्मचारी वारंवार नाकात बोट घालून त्याच हाताने पिझ्झाचे पीट मळतोय; तर दुसरी एक व्यक्ती त्याचा व्हिडीओ रेकॉर्ड करतेय. हा व्हिडीओ सुरू असताना पीठ मळणारा कर्मचारी हसत हसत पुन्हा नाकात बोट टाकून तेच बोट पिठाला पुसतो. दरम्यान, हा किळसवाणा प्रकार पाहून अनेकांनी संताप व्यक्त केला आहे. हा कर्मचारी ग्राहकांच्या आरोग्याशी खेळत असल्याचे अनेकांनी म्हटले आहे.

boy and girl conversation my dreams joke
हास्यतरंग : माझी स्वप्न…
china lithium found concern in india
भारतासाठी धोक्याची घंटा? चीनमध्ये सापडला लिथियमचा मोठा साठा,…
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू

यात व्हिडीओ समोर आल्यानंतर ‘डॉमिनोज’ला जाहीर माफी मागावी लागली.

मिरा- भाईंदरमधील विचित्र व्हिडीओ व्हायरल, तरुणीच्या गळ्यात पट्टा बांधून भररस्त्यात…; पाहा VIDEO

जपान टुडेच्या वृत्तानुसार, ‘डोमिनोज’चे म्हणणे आहे की, हा व्हिडीओ गेल्या सोमवारी दुपारी २ च्या सुमारास अमागासाकी शहरातील एका स्टोअरमध्ये शूट करण्यात आला आहे. व्हिडीओमध्ये दिसणारे कर्मचारी पार्ट टायमर होते. ते पीठ पिझ्झा बनविण्यासाठी वापरले नसल्याची ग्वाही कंपनीने दिली आहे. तसेच त्या दोन्ही कर्मचाऱ्यांना बडतर्फ केल्याचेही कंपनीने स्पष्ट केले आहे.

‘डोमिनोज’ने सांगितले की, व्हिडीओमध्ये सहभागी असलेल्या कर्मचाऱ्यांना रोजगार नियमांनुसार शिक्षा केली जाईल. त्यासोबतच त्यांच्यावर कायदेशीर कारवाईचाही विचार सुरू आहे.

Story img Loader