Domino’s pizza making unhygienic process: दैनंदिन जीवनात जंक फूड खाण्याची क्रेझ प्रचंड वाढली आहे. आजकाल अनेकजण मोठ्या आवडीने पिझ्झा, बर्गरसारखे जंक फूड खात असतात. पण तुम्ही खाता ते पदार्थ स्वच्छ आहेत की नाही? याची काळजी घेणं खूप गरेजचं आहे. हो कारण सध्या डॉमिनोजमधला एक विचित्र व्हिडीओ समोर आला आहे. तो पाहिल्यानंतर तुम्हाला पिझ्झा खायचा का नाही? असा प्रश्न पडू शकतो.
जगाच्या कानाकोपऱ्यात तुम्हाला अनेक फूडी लोक मिळतील. लोकांना वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ खायला खूप आवडतात. खास करुन फास्ट फूड. निरनिराळ्या ठिकाणचे फास्ट फूड लोक आवडीनं चाखतात. कुठेही बाहेर गेल्यावर लोक हमखास पिझ्झा, बर्गर, नूडल्स मागवतात. मात्र हे चमचमीत वाटणारे पदार्थ कसे बनवले जातात पाहिलं तर पुन्हा त्यांना हात लावण्याचीही इच्छा होणार नाही. आपल्यापैकी अनेकजण नावाजलेल्या ब्रॅंडचे खाद्यपदार्थ डोळे झाकून खात असतात, पण हे खूप धोकादायक ठरु शकतं. सध्या डॉमिनोजमधला समोर आलेला व्हिडीओ पाहिल्यावर तुम्ही पुन्हा त्याला हातही लावणार नाही.
या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, डॉमिनोजमधले कर्मचारी किचनमध्ये पिझ्झा तयार करत आहेत. यावेळी त्यांनी हातात काहीही घातलं नसून ते तसेच पिझ्झ बनवताना दिसत आहेत. पिझ्झा बनवणाऱ्या कामगारांनी आपले पूर्ण हात पिठात बुडवले आहेत. म्हणजे पिझ्झा बनवताना स्वच्छतेची अजिबात काळजी घेतली गेली नाही. एवढंच नाहीतर व्हेज आणि नॉनव्हेज पिझ्झा एकाच ठिकाणी बनवताना दिसत आहेत. अशाप्रकारे लोकांची फसवणूक करताना दिसत असून हा प्रकार अतिशय गंभीर आहे. या व्हिडीओमध्येही तरुण अशाप्रकारे दावा करत आहे.
पाहा व्हिडीओ
खाण्यापूर्वी १०० वेळा विचार कराल
बाजारात आधीच मोठ्या प्रमाणावर आपली फसवणूक होत असते. भेसळयुक्त पदार्थ, प्रक्रिया केलेले पदार्थ खाण्याशिवाय आता आपल्याला पर्याय नाही. कारण आता सर्वच पदार्थांमध्ये भेसळ केली जाते, त्यामुळेच हल्ली आजारी पडण्याचं प्रमाण वाढलं आहे.
सोशल मीडियावर हा व्हिडीओ samadhiya05 नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरु शेअर करण्यात आला आहे. यावर आता लोक संतापजनक प्रतिक्रिया देत आहेत. एकानं म्हंटलंय, “अशाप्रकारे लोकांची फसवणूक करणे चुकीचे आहे.” तर आणखी एकानं, “हे गंभीर असल्याचं म्हंटलंय”