डॉमिनोज पिझ्झाच्या शाखेत नोकरीच्या मुलाखतीला गेलेल्या महिलेने आपल्याबाबत भेदभाव केल्याची तक्रार केली आहे. नॉर्थ आयर्लंडच्या रहिवासी जेनिस वाल्श असे या महिलेचे नाव असून तिच्या तक्रारीनंतर डॉमिनोजला तिला तब्बल ४,००० युरोज म्हणजे जवळपास ३ लाख रुपयांची भरपाई द्यावी लागली आहे. मुलाखतीच्या दरम्यान विचारलेल्या एका प्रश्नावरून या महिलेने डॉमिनोज विरुद्ध तक्रार केली होती.

जेनीस यांनी बीबीसी न्यूजला दिलेल्या माहितीनुसार, मुलाखतीच्या दरम्यान त्यांना पहिला प्रश्न हा वयावरून केला गेला. जेनीस यांनी वय सांगताच संबंधित अधिकाऱ्यांनी त्याची नोंद करून त्यांना तू इतकी वयस्कर वाटत नाहीस असे म्हंटले. या मुलाखतीत जेनीस यांची निवड झाली नाही. पण हा निर्णय आपल्या कामाच्या पात्रतेवर नाही तर अधिकाऱ्यांनी आपले वय बघून घेतल्याचा दावा जेनीस यांनी केला आहे.

तसेच आपण एक महिला असल्याने आपल्याबाबत हा भेदभाव झाल्याचे सुद्धा जेनीस सांगतात. डॉमिनोजने ड्रायव्हरच्या नोकरीसाठी जाहिरात केली होती. मात्र आपला अर्ज केवळ आपण महिला असल्याने नाकारला असा आरोप जेनीस यांनी केला आहे. Domino’s Pizza च्या पिठावर टॉयलेट ब्रश लटकतायत? ‘या’ फोटोमुळे भडकले नेटकरी

या घटनेनंतर जेनीस यांनी डॉमिनोजच्या या शाखेतील मुख्य अधिकाऱ्यांशी संवाद साधून माहिती दिली. जेनीस यांच्या तक्रारीनंतर मुलखातकारांनी माफीनामा पाठवून त्यांची क्षमा मागितली. तसेच मुलाखतीत कोणाचे वय विचारणे उचित नसल्याची कल्पना नव्हती असेही स्पष्टीकरण देण्यात आले. जेनीस यांच्या तक्रारीला नॉर्थ आयर्लंडच्या समानता आयोगाने पाठिंबा देत डॉमिनोजच्या अधिकाऱ्यांना समज दिली. निवड प्रक्रियेत समाविष्ट असलेल्या व्यक्तींनी विशिष्ट नोकर्‍या कोण करू शकतात याबाबतच संकुचित विचारांना प्रोत्साहन देणे टाळावे असेही आयोगातर्फे सांगण्यात आले.

Story img Loader