Cheap Makeup Products Viral Video : आजकाल मेकअपच्या नावाखाली बनावट आणि स्वस्त ब्युटी प्रोडक्ट्स बाजारात बिनदिक्कतपणे विकली जात आहेत. धक्कादायक बाब म्हणजे लॅकमे, लोट्स अशा प्रसिद्ध कंपन्यांच्या नावाखाली हे मेकअप प्रोडक्टस् विकले जात आहेत, जे स्वस्त असल्याने अनेक मुली आणि महिला खोट्या खऱ्याची शहानिशा न करता ते खरेदी करतात. तुम्हीदेखील रस्त्यावरून स्वस्तात मेकअप प्रोडक्टस् खरेदी करत असाल तर व्हायरल होणारा धक्कादायक व्हिडीओ एकदा पाहा, जो पाहिल्यानंतर तुम्ही रस्त्यावरून १० रुपयांची लिपस्टिक, काजळ खरेदी करताना १०० वेळा विचार कराल. अनेकांनी हा व्हिडीओ पाहून तीव्र संताप व्यक्त केला आहे.
बाजारात फिरताना तुम्ही पाहिलं असेल, रस्त्याच्या कडेला एखादा विक्रेता अगदी १०, २० रुपयांमध्ये ब्रँडेड कंपन्यांच्या नावाने लिपस्टिक, काजळ, मस्करासह विविध प्रकारचे मेकअप प्रोडक्टस् विकत असतात. मुंबईतील रस्त्यारस्त्यांवर तुम्हाला असे स्वस्तात मेकअप प्रोडक्टस् विकणारे विक्रेता सापडतील, ज्यांच्यावर विश्वास ठेवून अनेक महिला ते ब्युटी प्रोडक्टस् विकत घेतात. पण, स्वस्तात मिळणारे ब्युटी प्रोडक्टस् नेमके कसे बनवले जातात कधी पाहिलं आहे का? नसेल तर एकदा व्हायरल होणारा व्हिडीओ पाहा, जो पाहून तुम्ही भविष्यात रस्त्यावरून ब्युटी प्रोडक्टस् खरेदी करताना खूप विचार कराल.
लिपस्टिक बनवण्याची ही गलिच्छ पद्धत पाहून तुम्हालाही वाटेल किळस
व्हिडीओत तुम्ही पाहू शकता की, एका गलिच्छ ठिकाणी लिपस्टिक बनवल्या जात आहेत. यासाठी अनेक प्रकारची भांडीदेखील आहेत. यावेळी एक व्यक्ती भांड्यात लाल रंगाची पावडर घेतो, ज्यात कोणते तरी काळ्या रंगाचे केमिकल मिसळतो आणि दुसऱ्या भांड्यात अतिशय अस्वच्छ कापडातून गाळत ठेवतो. यानंतर दुसरे भांडे उचकून एका मशीनमध्ये ओततो. या मशीनमधून लिपस्टिक लिक्विड साच्यात भरले जाते. यानंतर लिक्विड घट्ट होताच लिपस्टिक बनून तयार होते. अशाप्रकारे कोणतीही स्वच्छता न बाळता किंवा सुरक्षेची काळजी न घेता अतिशय गलिच्छ पद्धतीने या लिपस्टिक तयार केल्या जातात. यानंतर त्याचे चांगले पॅकिंग करून बाजारात स्वस्तात विकल्या जातात.
जर तुम्हीही अशा स्वस्तात लिपस्टिक याआधी विकत घेतल्या असाल, तर आता वापरताना जरा काळजी घ्या. कारण या बनवताना तुमच्या त्वचेला ते कितपत हानिकारक ठरू शकते किंवा काय, याचा कसलाही विचार केलेला नाही. दरम्यान, हा व्हिडीओ पाहून आता अनेकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.
@travelfoodwala555 नावाच्या अकाउंटवरून हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. ज्यावर युजर्स वेगवेगळ्या कमेंट्स करत आहेत. एका युजरने लिहिले की, लिपस्टिक बनवण्याची ही अतिशय घाणेरडी पद्धत आहे, हे फारचं चुकीचे आहे, दुसऱ्या युजरने लिहिले की, स्वस्तात मिळणाऱ्या मेकअप प्रोडक्टस् मागची ही काळी बाजू आहे. तिसऱ्या युजरने लोकांना आवाहन केले की, रस्त्यावर स्वस्तात विकले जाणारे मेकअप प्रोडक्टस् चुकूनही खरेदी करू नका.
© IE Online Media Services (P) Ltd