अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे नेहमीच चर्चेत असतात. त्यातून महिलांबाबतीत त्यांची मतं फार काही ठिक नाहीत. अगदी राष्ट्राध्यक्ष होण्याआधीपासून त्यांनी महिलांवर ज्या काही टीकाटिप्पण्या केल्यात ते अजूनही लोकांना लक्षात असेल. पण ही झाली निवडणुकांपूर्वीची वक्तव्यं. आता ते एका महासत्तेचे राष्ट्राध्यक्ष झालेत म्हटल्यावर महिलांशी बोलताना शंभर वेळा विचार करुन बोलणं अपेक्षित आहे. पण विचार करून बोलतील ते ट्रम्प कसले. तेव्हा फ्रान्सच्या फर्स्ट लेडींची भेट घेताना त्यांच्या तोंडून असं काही निघालं की जे ऐकून त्यांची अवस्था खजील झाल्यासारखी झाली आणि काय बोलावं हे त्यांना कळलंच नाही.

वाचा : फ्रान्सच्या अध्यक्षांची ‘स्कूलवाली लव्हस्टोरी; २५ वर्षांनी मोठ्या असलेल्या शिक्षिकेशी केला विवाह

डोनाल्ड ट्रम्प आणि पत्नी मेलानिया यांनी फ्रान्स राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांची भेट घेतली. त्यावेळी इमॅन्युएल यांच्यापेक्षा २५ वर्षांनी मोठ्या असलेल्या त्यांच्या पत्नी ब्रिजेट या देखील उपस्थित होत्या. आता काही देशात हस्तांदोलन करून पाहुण्याचे स्वागत केलं जातं. फ्रान्समध्ये मात्र स्वागत करण्याची पद्धत थोडी वेगळी आहे. डोनाल्ड ट्रम्प यांचं तशा पद्धतीनं स्वागत करायचं म्हणजे फ्रान्सच्या फर्स्ट लेडी ब्रिजेट आधीच कचरत होत्या. पण अतिथी म्हटल्यावर ट्रम्प दाम्पत्यांचं त्यांनी स्वागत केलं. या भेटीगाठीदरम्यान नेहमीप्रमाणे ट्रम्प यांची जीभ घसरली आणि ब्रिजेटना पाहून त्यांनी ‘You’re in such good shape. She’s in such good physical shape. Beautiful’ असं म्हटलं. हे ऐकून ६४ वर्षांच्या ब्रिजेट यांना अवघडल्यासारखं झालं आणि काय बोलावं हे त्यांना कळलंच नाही.

Viral Video : पोलंडच्या फर्स्ट लेडीने ट्रम्प यांचा केला पचका!

कदाचित अनेकांना माहिती नसेल पण ब्रिजेट आणि इमॅन्युएल या दोघांमध्ये २५ वर्षांचे अंतर आहेत. इमॅन्युएल ज्या शाळेत शिकायचे त्या शाळेत ब्रिजेट शिक्षिका होत्या. ब्रिजेट यांना आधीच्या लग्नापासून तीन मुले आहेत तर त्यांना ७ नातवंडं देखील आहेत. २००७ मध्ये त्यांनी इमॅन्युएल यांच्याशी विवाह केला.

 

Story img Loader