Donald Trump Imran Khan Fact Check : लाइटहाऊस जर्नलिझमला डोनाल्ड ट्रम्पचा व्हिडीओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर मोठ्या प्रमाणावर शेअर केला जात असल्याचे आढळून आले. या व्हिडीओमध्ये डोनाल्ड ट्रम्प यांनी, (भाषांतर) “नमस्कार, माझ्या पाकिस्तानी अमेरिकन मित्रांनो, जर मी जिंकलो, तर इम्रान खानला लवकरात लवकर तुरुंगातून बाहेर काढण्यासाठी मी सर्वतोपरी प्रयत्न करीन. तो माझा मित्र आहे. माझे त्याच्यावर प्रेम आहे. मी त्याला पुन्हा सरकार बनवण्यास मदत करीन आणि पुढे जाण्यासाठी पाठिंबा देईन. आमचे संबंध अधिक दृढ करण्यासाठी आम्ही एकत्र काम करू.” असे आश्वासन दिले होते, असा दावा केला आहे. त्यांच्या या व्हिडीओमुळे अनेक चर्चांना उधाण आले आहे. पण, खरंच डोनाल्ड ट्रम्प यांनी इम्रान खान यांच्याबाबत असे कोणते आश्वासन दिले होते का? याविषयी जेव्हा तसाप केला तेव्हा वेगळे सत्य समोर आले, ते नेमके काय हे पाहूया…
काय होत आहे व्हायरल?
एक्स युजर @SeherUjala ने त्यांच्या एक्स हॅण्डलवर व्हायरल व्हिडीओ शेअर केला आहे.
इतर युजर्सदेखील असाच दावा करीत व्हिडीओ शेअर करीत आहेत.
या वर्षी मार्चमध्ये डीपफेक ऑडिओही शेअर करण्यात आला होता.
तपास :
अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या इम्रान खानबद्दलच्या विधानांबद्दल आम्हाला कोणतेही वृत्त आढळले नाही.
दारूची नशा बेतली जीवावर! मद्यधुंद तरुणाचा उकळत्या दुधाच्या कढईवर गेला तोल अन्…; वेदनादायी VIDEO
आम्हाला foreignpolicy.com वर एक बातमी आढळली. त्यामध्ये म्हटले आहे : तुरुंगात असलेले माजी पाकिस्तानी पंतप्रधान इम्रान खान यांच्या समर्थकांना अशी आशा होती की, डोनाल्ड ट्रम्प यांना इम्रान खान यांच्या दुर्दशेकडे लक्ष वेधून काहीतरी पोस्ट करण्यासाठी वेळ मिळेल; पण असे काही झाले नाही.
त्यामुळे आम्हाला विश्वास बसला की, हा व्हिडीओ डीपफेक ऑडिओ वापरून बनवला गेला असावा.
आम्ही व्हिडीओ डाउनलोड केला आणि तो अनेक AI डिटेक्शन टूलच्या मदतीने ऑडिओमध्ये रूपांतरित करून तपास सुरू केला.
आम्ही तो ऑडिओ InVid अॅडव्हान्स टूल्समध्ये ऑडिओ टूलद्वारे रन केला. यावेळी Hiya.com ने सूचित केले की, सबमिट केलेला ऑडिओ बहुधा AI टूलद्वारे जनरेट केलेला आहे. त्यांनी हा ऑडिओ व्हॉइस क्लोनिंगद्वारे बनविल्याचेही सूचित केले.
त्यानंतर आम्ही ऑडिओ फाइल हायव्ह मॉडरेशनद्वारे चेक केली. त्यामध्येही हा ऑडिओ AI टूलद्वारे जनरेट केल्याचे सांगण्यात आले,
निष्कर्ष :
डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना तुरुंगातून मुक्त करण्याचे कोणतेही आश्वासन दिले नव्हते. व्हायरल ऑडिओ क्लिप आणि व्हिडीओ व्हाइस क्लोनिंग ट्रेक्निकचा वापर करून एआयद्वारे तयार करण्यात आला आहे. त्यामुळे व्हायरल होणारा हा दावा खोटा आहे.