Donald Trump Tagged Trendulkar: भारतात लोकसभा निवडणुकांपाठोपाठ महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांची जोरदार चर्चा असून महाविकास आघाडी व महायुती यांच्यात ही थेट लढत असल्याचं बोललं जात आहे. जागतिक पटलावर मात्र अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीची चर्चा आहे. माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प व माजी परराष्ट्रमंत्री हिलरी क्लिंटन यांच्यात थेट सामना होणार असून जागतिक महासत्ता कुणाच्या हातात जाणार, याविषयी मोठी उत्सुकता पाहायला मिळत आहे. डोनाल्ड ट्रम्प सध्या वेगवेगळ्या प्रकारे मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत असून त्यांचा असाच एक प्रयत्न सध्या त्यांचं ट्रोलिंग होण्यासाठी कारणीभूत ठरला आहे. कारण डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेतल्या निवडणुकीसाठी थेट मुंबईच्या गोरेगावमध्ये राहणाऱ्या एका व्यक्तीला टॅग केलं आहे!

नेमकं काय घडलं?

डोनाल्ड ट्रम्प सोशल मीडियाच्या माध्यमातून अमेरिकन मतदारांना मत देण्याचं आवाहन करत आहेत. मात्र, त्यांनी एका सोशल मीडिया अकाऊंटला टॅग करून असंच आवाहन केल्यानंतर त्यावरून तुफान ट्रोलिंग सुरू झालं आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी एक्सवर Trendulkar नावाच्या एका सोशल मीडिया अकाऊंटला टॅग करून हे मतदानाचं आवाहन केलं आहे. “नॉर्थ कॅरोलिना, मतपत्रिकेसाठी विनंती करण्याचा हा शेवटचा दिवस आहे”, असं या पोस्टमध्ये म्हटलं आहे. तसेच, नोंदणीसाठी काय करावं लागेल, हे मतदारांना समजण्यासाठी खाली लिंकदेखील दिली आहे.

Rajasthan Woman Anita Chaudhary Murder
Rajasthan Woman Murder: दोन दिवसांपूर्वी बेपत्ता झालेल्या महिलेचा निर्घृण खून; मृतदेहाचे केले सहा तुकडे, आरोपी गुल मोहम्मदचा शोध सुरू
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
India-Canada Conflict United States reacts
India Canada Row: खलिस्तानी अतिरेक्यांच्या हत्येमागे अमित शाह? कॅनडाच्या आरोपाची अमेरिकेकडून दखल; म्हणाले, “चिंताजनक…”
Palghar MLA Shrinivas Vanga return
Shrinivas Vanga: ‘आधी रडले, ठाकरेंना देव म्हणाले’, घरी परतल्यावर आमदार श्रीनिवास वनगांचे सूर बदलले; म्हणाले, “एकनाथ शिंदे…”
MNS Chief Raj Thackeray
महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण होईल? राज ठाकरेंनी थेट नावच सांगितलं; म्हणाले…
women are saying no to sex after Trumps win
डोनाल्ड ट्रम्प यांच्या विजयानंतर अमेरिकेतील महिलांचा लैंगिक संबंधास नकार; कारण काय? काय आहे 4B चळवळ?
Donald Trump Won US Presidential Election 2024
Donald Trump Won US Election 2024: दुसऱ्या टर्मसाठी डोनाल्ड ट्रम्प यांचा अजेंडा ठरला; पहिल्याच भाषणात केला उल्लेख, म्हणाले…
train hits student sitting on track with headphones
हेडफोन आणि मोबाइल ठरलं मृत्यूचं कारण; रेल्वे ट्रॅकवर बसलेला विद्यार्थी ट्रेनखाली चिरडला, कुटुंबानं एकुलता मुलगा गमावला

पण हे Trendulkar अकाऊंट कुणाचं आहे, हे समोर आल्यानंतर ट्रम्प यांच्या पोस्टला ट्रोल केलं जात आहे. खुद्द या व्यक्तीनंच ट्रम्प यांची पोस्ट रीट्वीट करून त्यावर प्रतिक्रिया दिली आहे. “भाई, मैं गोरेगाव में रेहता हूँ”, असं या व्यक्तीने आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

Donald Trump: कमला हॅरिस की डोनाल्ड ट्रम्प, कोण अधिक श्रीमंत? कोणाची संपत्ती किती?

या पोस्टवर नेटिझन्सकडून तुफान कमेंट येऊ लागल्या आहेत. एका व्यक्तीने “तू फार नशीबवान आहेस मित्रा. ट्रम्प यांनी तुला टॅग केलं आहे”, अशी कमेंट केली आहे. एका युजरनं “आम्ही भारतातील राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाच्या उमेदवाराला समर्थन देऊ”, अशी पोस्ट केली आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतीय व्यक्तीला का टॅग केलं?

डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेतील राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत मुंबईत राहाणाऱ्या एका व्यक्तीला का टॅग केलं, याबाबत सध्या तर्क लावले जात आहेत. त्यांनी अशाच प्रकारे काही दिवसांपूर्वी स्कॉटलंडमधील एका फुटबॉल चाहत्यालाही टॅग करून निवडणुकीसंदर्भात पोस्ट केली होती. भारतातील Trendulkar प्रमाणेच Alex Marr या स्कॉटलंडमधील व्यक्तीलाही त्यांनी टॅग करून नॉर्थ कॅरोलिना निवडणुकीबाबत आवाहन करणारी पोस्ट शेअर केली होती. त्यावेळी अॅलेक्स मार यांनीही “माफ कर मित्रा, पण मी साऊथ कॅरोलिनामध्ये राहतो”, अशी कमेंट केली होती.

Story img Loader