अमेरिकेचे नवर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची कन्या इवांका ट्रम्प हिच्या सोबत एका सहप्रवाशाने विमानात गैरवर्तणूक केली आहे. आपल्या कुटुंबियासोबत ती जेट ब्लूच्या विमानेने प्रवास करत होती तेव्हा डोनाल्ड ट्रम्प यांच्यावरून एका अमेरिकन नागरिकाने इवांकाला कडवे बोल सुनावले. या व्यक्तीला जेट ब्ल्यू विमान कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी तात्काळ विमानाबाहेर काढले पण तरीही इवांकाला दोष देणे त्याने सोडले नाही.
वाचा : डोनाल्ड ट्रम्प यांच्या मुलीसोबत कॉफी डेटला जाण्यासाठी ३३ लाखांची बोली
न्यूयॉर्कच्या जॉन एफ. केनेडी विमानतळावरुन ती आपल्या मुलांसोबत बाहेर जात होती. तेव्हा या विमानातील सहप्रवशाने तिच्यासोबत गैरवर्तन केले. ‘हिच्या वडिलांनी अमेरिकेची पुरती वाट लावली आहे. असे असताना त्यांची मुलगी विमानात काय करते आहे? असे इवांकाला पाहून त्याने बोलायला सुरुवात केली. ‘इवांका श्रीमंत आहे तेव्हा तिने प्रायव्हेट जेटने प्रवास करण्यापेक्षा सार्वजनिक विमान सेवेचा वापर का केला?’ असे विचारत ही व्यक्ती तिच्यावर खेकसली. हा सारा प्रकार विमान कर्मचा-यांना कळताच त्याने या प्रवाशाला विमानातून बाहेर काढले. ‘मत व्यक्त केले म्हणून मला विमानातून का बाहेर काढले?’ असेही तो विमान कर्मचा-यांवर ओरडला.
VIRAL VIDEO : नियम धुडकावणा-या महिलेला विमानातून फरफटत काढले बाहेर
दरम्यान हा सारा प्रकार आता सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनला आहे. ८ नोव्हेंबरला अमेरिकन अध्यक्ष पदाची निवडणुक पार पडली. यात डोनाल्ड ट्रम्प अनपेक्षितरित्या विजयी झाले. त्यांच्या विजयामुळे अनेक अमेरिकन नागरिकांना धक्का बसला. ट्रम्प यांचे राष्ट्रध्यक्ष होणे म्हणजे अमेरिकेला अधोगतीच्या दरीत ढकलण्यासारखे आहे असे मानणारा मोठा वर्ग अमेरिकेत आहे. ट्रम्प यांच्या विजयाने अमेरिकेत अनेकांनी निदर्षेने केली. त्यामुळे याचा राग त्यांच्या कुटुंबियांवर निघणे स्वाभाविक आहे. अशातच इवांका आयती तावडीत सापडल्याने या प्रवाशाने ट्रम्प यांचा राग तिच्यावर काढला. आपण या धक्क्यातून सावरत असून आपल्यासाठी हा अनुभव भितीदायक स्वप्नासारखा होता असेही इवांकाने सांगितले.