अमेरिकन राष्ट्राध्यक्षीय पदाची निवडणुक ८ नोव्हेंबरला पार पडली. दुस-याच दिवशी रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे अनपेक्षितरित्या विजयी झाले. डोनाल्ड ट्रम्प यांनी या महसत्तेच्या गादीवर बसणे हे सगळ्यांनाच अनपेक्षित होते. डेमोक्रेटिक पक्षाच्या अध्यक्ष हिलरी क्लिंटन अमेरिकेच्या पहिल्या महिला राष्ट्रध्यक्ष होतील आणि इतिहास घडवतील अशी जगाला आशा होती पण अगदी अनपेक्षितरित्या ट्रम्प यांनी हिलरींवर मात केली. निवडणुकांचे निकाल जाहिर झाल्यानंतर अनेकांना धक्का बसला, हिलरीसमर्थक आणि ट्रम्प विरोधक सगळ्यांच्या डोळ्यांत या निर्णयाने अश्रू आले. पण यातूनही ट्रम्प यांच्या विजयाने एका छोट्या मुलीला रडू कोसळले. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
५ वर्षांची रिमा ही मुस्लिम आहे. ट्रम्प निवडून आल्यानंतर आपल्याला हा देश सोडून जावे लागेल की काय या कल्पनेने तिला रडू कोसळले. तिच्या काकाने तिचा व्हिडिओ सोशल मीडियावर टाकला आहे. ट्रम्प यांनी अनेकदा आपल्या प्रचाराच्या भाषणातून मुस्लिमविरोधात भूमिका मांडली आहे. मुस्लिम समाजावर अमेरिकेत बंदी घालू असे विधान त्यांनी केले होते. त्यामुळे अमेरिकेतल्या मुस्लिम आणि स्थलांतरितांना याचा मोठा धक्का बसला आहे. प्रसिद्ध युट्युबर अॅडम सलेह यांनी तिचा व्हिडिओ प्रसिद्ध केला आहे. त्यानंतर तिचे सांत्वन करणारे संदेश या कुटुंबाला आले. या धक्क्यातून रिमा सावरली असून शाळेत जायला मात्र तिला भिती वाटत असल्याचेही त्याने सांगितले. ट्रम्प यांच्या विजयानंतर दुस-याच दिवशी सिअॅटल मध्ये ट्रम्पविरोधात रॅली काढण्यात आली होती. अनेकांनी ट्रम्प यांच्या विरोधात निदर्शने देखील केली.
Reema is only 5 years old. She knows that we’re Muslim and started crying when she saw Donald Trump winning… smh pic.twitter.com/jt6tlw1UEi
— Adam Saleh (@omgAdamSaleh) November 9, 2016