डोनाल्ड ट्रम्प….बस नाम ही काफी है. हे नाव मनात आणलं की हसू, राग, भीती, डोक्याला हात लावावासा वाटणं वगैरे सगळं काही एकदम वाटतं. अमेरिकनांसाठी जाम डोकेदुखी ठरत असलेले डोनाल्ड ट्रम्प बाकी जगासाठी (सध्यातरी) काॅमेडीचं कारण ठरत आहेत. आता नवीन काय झालंयं? किंवा नवीन काय व्हायचं राहिलंय? असं वाटणं साहजिक आहे.
त्यासाठी पहा हा व्हिडिओ
सौजन्य- यूट्यूब
अमेरिकन दौऱ्यावर आलेले जपानचे पंतप्रधान शिंझो आबे यांनी ट्रम्प यांची व्हाईट हाऊसमध्ये भेट घेतली. त्यावेळेला हा प्रसंग घडला.यावेळी हँडशेक करत असताना एका शाळकरी मुलाला थोपटावं अशा पध्दतीने ते जपानच्या पंतप्रधानांचा हात थोपटत होते.
VIDEO – काहीही कर पण तू गाऊ नको!!
याशिवाय आणखी एक विनोदी प्रकार घडला. या दोघांच्या भेटीदरम्यान जपानचे माध्यमप्रतिनिधीही तिथे हजर होते. ते जॅपनीज् भाषेत या दोघांना त्यांच्या कॅमेऱ्यांकडे बघायला सांगत होते. हे ट्रम्प यांना न कळल्याने त्यांनी हे फोटोग्राफर्स काय म्हणत आहेत असं आबेंना विचारलं. त्यावर आबे यांनी “माझ्याकडे बघा” असं सांगितलं. ट्रम्प यांनी लगेच हसत हसत आबेंकडे पहायला सुरूवात केली. पण ‘माझ्याकडे बघा, असं फोटोग्राफर्स म्हणत आहेत’ असा शिंझो आबेंच्या बोलण्याचा अर्थ होता. हे ट्रम्प यांच्या गावीही नव्हतं. त्यांना हे कळत नसल्याचं दिसल्याने आबेंनी त्यांना कॅमेऱ्यांकडे पहा असं हाताने सांगायचा प्रयत्न केला. पण आबेंचा हात थोपटण्यात गुंतलेल्या ट्रम्पना हे शेवटपर्यंत हे कळलं नाही.
अमेरिकेच्या सर्वात विचित्र राष्ट्राध्यक्षांपैकी एक असणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांची हँडशेक करण्याची वेगळी पध्दत सगळ्यांच्या नजरेला पडतेय. आता साधा हँडशेक करण आपल्या सगळ्यांना जमतं. पण अमेरिकन अध्यक्षांना ही साधी गोष्ट पुन्हा शिकायची वेळ आली आहे, असं वाटतं. वरत्या व्हिडिओमध्ये पाहिलेल्या प्रकाराशिवायही ट्रम्प यांना आणखी एक सवय आहे. आपण ज्याला भेटतो आहोत त्याच्याशी हँडशेक करताना डोनाल्ड ट्रम्प त्याला आपल्याकडे विचित्र पध्दतीने खेचतात. पहा पुढच्या ट्वीटमधला हा व्हिडिओ
There’s no escaping Donald Trump’s handshake pic.twitter.com/nZiXiy1SOp
— VICE News (@vicenews) February 11, 2017
सौजन्य -ट्विटर
हा असा हँडशेक आपण कोणीही करत नाही. डोनाल्ड ट्रम्प यांच्या या विचित्र स्टाईलमुळे समोरचा खरोखरचा हादरून जातो. पण आता ट्रम्प अमेरिकेचे अध्यक्ष झाल्यामुळे समोरच्याला ‘हेहेहे’ करत हे सगळं सहन करावं लागतं.
नवे अध्यक्षमहोदय आणखी किती दिवे पाजळणार आहेत देवालाच माहिती. पण हे व्हिडिओज् पाहून त्यांना यापुढे भेटणारे जगभरातले नेते नक्कीच विचारात पडले असतील.