Farmer viral video: आपण शेतकऱ्याला जगाचा पोशिंदा म्हणतो. शेतकरी सुखी राहिला तर देश आणि जग सुखी राहील असं आपण मानतो. जय जवान जय किसान अशा ब्रीदवाक्याचा वारंवार नेतेमंडळींकडून उल्लेख केला जातो. पण या शेतकऱ्याच्या डोळ्यांमध्ये येणारे अश्रू काळजाचा ठोका चुकवणारे आहेत. आधीच आर्थिक अडचणींचा डोंगर कमी होईना, त्यातल्या त्यात ही नैसर्गिक आपत्ती सुचू देईना असली गत शेतकऱ्यांची झाली आहे. त्यात शेतकऱ्याच्या मालाला नेहमीच कमी भाव मिळतो. त्यात एवढ्या कमी भावातही लोक शेतकऱ्यांकडून खरेदी करताना ५ , १० रुपयांसाठी बाचाबाची करतात किंवा भाव कमी करतात. यालाच वैतागलेल्या एका शेतकऱ्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. बाजारात शेतकऱ्याला आलेला अनुभव ऐका अन् तुम्हीच सांगा तुम्हाला ‘हे’ पटतंय का?

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

जमिनीत घाम गाळून सोन्यासारखं अन्न पिकवणारा त्याच्या वाट्याला संकट फार आणि सुख कमीच. कधी अवकाळी संकट तर कधी कर्ज आणि इतर त्रास शेतकऱ्याची काही समस्यांमधून सुटका होत नाही. कितीही संकट आली तरी शेतकरी आपल्या जमिनीवरचं प्रेम कधीच कमी करत नाही. जमीन ही त्याचा श्वास आणि जीव असते. लेकरांप्रमाणे आपल्या जमिनीचा सांभाळ तो करतो. मात्र हाच शेतकरी आज कोणत्या संकटाला सामोरं जातोय, किती संघर्ष सोसतोय, याची कल्पना आपण किंचितही करु शकणार नाही. एवढं होऊनही “ओ दादा पाच रुपये कमी करा की, केवढं महाग आहे ;अशा पद्धतीचा रोख ऐकायला मिळतो. मात्र हेच लोक मॉलमध्ये गेल्यावर काहीही न बोलता आहे त्या किमतीत वस्तू काय तर भाजीपालाही विकत घेतात. या शेतकऱ्यानं हीच व्यथा मांडत त्याला बाजारात आलेला अनुभव सांगितला आहे.

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, हा शेतकरी राजा भाव कमी कर म्हणणाऱ्या लोकांना उद्देशून म्हणतोय की, “८०० रुपयांचं मटण घेतात पण ५ रुपयांची कोथिंबीर घ्यायला लाज वाटते” अनेकवेळा आपण पाहतो लोक अगदी २ रुपयांच्या कोथिंबीरीतहा भाव करतात. शेतकरी राजा हा इतरांसारखा श्रीमंत होण्यासाठी कष्ट नाही करत तर जगण्यासाठी संघर्ष करतो हे सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिदजे. तसेच ५, १० रुपयांसाठी भाव करतानाही विचार केला पाहिजे.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> “आयुष्यभराचं बापाचं कर्ज, मुठभर गुलालात फेडलं” बाप-लेकाचा हा VIDEO पाहून प्रत्येकाच्या डोळ्यांत येईल पाणी

सोशल मीडियावर हा व्हिडीओ vithu_mauli_official नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंवरुन शेअर करण्यात आला आहे. एकदम बरोबर, मन जिंकलस भावा अशा प्रतिक्रिया नेटकरी देत आहेत. एकानं म्हंटलंय “कष्टाची किंमत करा भाजीपाल्याची नको” तर आणखी एकानं “दोन-पाच रुपयांसाठी शेतकऱ्यांसोबत भाव करू नका, कष्टाची किंमत करा” अशी प्रतिक्रिया दिली आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dont bargain with farmers farmer saying truth video goes viral on social media srk