जीवनात मिळालेल्या किंचित‎ यशाने हुरळून जावू नका. ध्येय दूरस्थ‎ ठेवून ते जिद्दीने गाठा. आयुष्यात ईच्छा,‎ महत्वाकांक्षा, ध्यास या तीन गाेष्टींकडे‎ लक्ष द्या. अशक्य गाेष्ट शक्य करायची‎ असेल तर त्यासाठी अथक परिश्रमाची‎ तयारी ठेवा, असा सल्ला आपल्याला मोठी माणसं नेहमी देतात. यशाने हुरळून जाऊ नये आणि अपयशाने खचून जाऊ नये असे आपले पूर्वज आपल्याला सांगत असत, त्यामागे असलेले कारण या गोष्टीतून जाणून घेऊ. एका व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, यातून यामागचं कारण अगदी सहज स्पष्ट होत आहे.

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एके ठिकाणी सायकलींगची स्पर्धा आहे. यामध्ये दोन स्पर्धक सर्वांच्या आधी पोहचले असून स्पर्धा जिकंण्यासाठी काहीच पावलं राहिली आहेत. यावेळी त्या दोघांनाही आधिच एकमेकांना मिठी मारुन अभिनंदन केलं, आणि तेवढ्यात मागून आलेला स्पर्धक पुढे गेला आणि त्यानं स्पर्धा जिंकली. यामुळं कोणतही यश लगेच साजरं करु नका, डाव कधीही पलटू शकतो. अशाप्रकारे शेवटच्या क्षणी हा डाव पलटला. मिळालेल्या यशाने आपण हुरळून जातो. एसएससीला पहिला आलेला नंतर कोठे दिसत नाही. त्यामुळे आत्मविश्वास बाळगा. यशाने हुरळून जाऊ नका आणि अपयशाने खचूनही जाऊ नका.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> बापरे! एका खेकड्याची किंमत लावली ५७ हजार; महिलेनं हॉटेल मालकाविरोधात पोलिसांत केली तक्रार

सोशल मीडियावर रोज वेगवेगळे व्हिडीओ व्हायरल होत असतात. त्यापैकी काही व्हिडीओ लोकांच्या अधिक पसंतीला पडतात. काही व्हिडीओ खूप काही शिकवून जातात.

Story img Loader