मुसळधार पावसाने मुंबई पुण्यासह संपूर्ण महाराष्ट्राला झोडपून काढले आहे. महाड, माणगाव, पोलादूप तालुक्यातील नद्यांची पातळीमध्ये प्रंचड वाढ झाली आहे. पुरसदृश स्थिती निर्माण झाली आहे, रस्ते जलमय झाले होते. साचलेल्या पाण्यातून लोकांची वाहनांची ये-जा सुरु होते. अनेक ठिकाणी लोकांच्या घरातही पाणी शिरले. रेल्वेचे रुळ पाण्याखाली गेल्याने रेल्वे वाहतूकही विस्कळीत झाली होते. त्यामुळे चाकरमान्यांचे ऐनवेळी मोठी गैरसोय झाली होती. दरम्यान रस्त्यावर वाहनांच्या लांबच लांब रांगाही लागल्या होते. पुणे जिल्ह्यात घाटमाथ्यावर मोठ्या प्रमाणात पाऊस झाला. ताम्हिणी घाटातदेखील मोठ्या प्रमाणात पाऊस झाला. दरम्यान आता ताम्हिणी घाटात (ता,२५ रोजी) दरड कोसळल्याने वाहतूक ठप्प झाली होती. घाटामार्गातील रस्ता धोकादायक झाल्यामुळे रायगड पोलिसांनी नागरिकांना ताम्हिणी घाटात न जाण्याचे आवाहन केले.

सोशल मीडियावर रायगड-पुणे मार्गावरील ताम्हिणी घाटात दरड कोसळचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. घाटातील रस्ता बंद झाल्याने वाहतूक ठप्प झाली होती. जोपर्यंत मातीचा ढिगारा हटत नाही तोपर्यंत या घाट बाजूच्या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. त्यामुळे माणगावं पुणे, मुंबई -गवा महामार्गावर प्रवास टाळावा असे आवाहन सोशल मीडियावर काही जण करताना दिसत आहे. व्हायरल व्हिडिओ एक्सवर Common Man नावाच्या अकाऊंटवर पोस्ट केला आहे. व्हिडिओ पोस्ट करताना कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, #महाराष्ट्र | रायगड-पुणे मार्गावरील ताम्हिणी घाटात दरड कोसळल्याने ढिगारा हटेपर्यंत या घाट बाजूच्या मार्गावरील वाहतूक ठप्प : रायगड पोलीस )

ताम्हिणी घाट हे पुण्याजवळी वर्षाविहाराचा आनंद लुटण्यासाठी उत्तम ठिकाण आहे त्यामुळे पावसाळ्यात मोठ्या संख्येने लोक ताम्हिणी घाटाला भेट देतात. दरम्यान काही लोक सुरक्षिततेची काळजी घेत नाही आणि स्वतःसह इतरांचा जीवही धोक्यात टाकतात. काही दिवसांपूर्वी एका तरुण ताम्हिणी घाटातील धबधब्यात वाहून गेल्यानंतर बेपत्ता झाला होता. त्यामुळे ताम्हिणी घाटात जाणाऱ्य नागरिकांना आधीपासूनच सतर्कतेचा इशारा देण्यात आला होता. दरम्यान आता मुसळधार पावसामुळे ताम्हिणी घाटामार्ग धोकादायक असल्यानेन पर्यायी मार्गाचा वापर करण्याची सुचना दिली जात आहे.