महिंद्रा अॅण्ड महिंद्राचे सर्वेसर्वा आनंद महिंद्रा नेहमीच व्हॉट्स अॅपवर आलेले भन्नाट, हटके व्हिडीओ, फोटो आणि महिती शेअर करतात. एखादी गोष्ट आवडली तर ते ट्विटवर #whatsappwonderbox हा हॅशटॅग वापरून ट्विट करतात. सामान्यपणे अनेकदा फॉर्वडेड मेसेज आपण कंटाळून डिलीट करतो मात्र हेच व्हॉट्स अॅप आनंद महिंद्रांना आश्चर्याचा पेटारा आहे असं म्हणतात. नुकतेच त्यांनी असेच काही फोटो हा हॅशटॅग वापरून शेअर केले आहेत.

आनंद महिंद्रांनी केलेल्या ट्विटमध्ये ते म्हणतात, ‘चूकूनही ऑटोमोबाइल इंजिनिअरला तुमच्या घराची डिझाइन करायला सांगू नका.’ या ट्विटमध्ये त्यांनी चार भन्नाट फोटो ट्विट केले असून या सर्व फोटोंमध्ये गाड्यांशी संदर्भात स्पेअरपार्ट वापरून घरातील वेगवेगळ्या वस्तू तयार केल्या आहेत. पहिल्या फोटोमध्ये गाडीचे चाक, पेट्रोल पंपवारील पाईपचा हॅण्डल वापरून तयार केलेले बेसिन आहे. तर दुसऱ्या फोटोमध्ये मोठ्या स्प्रिंग वापरून तयार केलेल्या खुर्च्या आहेत. तिसऱ्या फोटोमध्ये गाडीच्या आरामदायी सीटमधून बनवलेली टॉयलेट सीट दाखवण्यात आली आहे. तर चौथ्या फोटोमध्ये चाकांच्या रीमपासून तयार करणाऱ्या खुर्च्या दिसतात.

अनेकांनी महिंद्रांच्या या ट्विटला उत्तर देताना अशाचप्रकारे गाड्यांचे स्पेअरपार्ट्स वापरून तयार करण्यात आलेल्या भन्नाट गोष्टींची फोटो ट्विट केले आहेत. यात अगदी रिसेप्शन काऊण्टरपासून ते हेडलाईटपासून बनवलेल्या गणपती बाप्पांपर्यंतचे फोटो शेअर केले आहेत.

खरं तर हे फोटो पाहून कोणीही एखाद्या ऑटोमोबाईल इंजिनियरलाच आपल्या घराचे डिझायनिंग करायला देईल अस म्हणण्यास हरकत नाही.