बदलत्या काळात अनेक सोयी सुविधा आपले दैनदिन जीव सुलभ करत आहेत. त्यापैकीच एक म्हणजे उबेर, ओला सारख्या कंपन्या कुठेही जाण्यासाठी कार, रिक्षाची बुक करण्याची सुविधा देतात. एका क्लिकवर बुक होणार्‍या या सेवांमुळे प्रवास करणे सोपे झाले असले तरी अनेकदा कारच्या कार चालक आणि प्रवाशांमध्ये वाद होताना दिसतात त्यामुळे सुरक्षेबाबत चिंता व्यक्त केली जाते. अनेकदा प्रवास भाड्यावरून तर कधी चुकीच्या वर्तणूकीमुळे प्रवासी आणि कार चालकांमध्ये वाद होतात. असाच काहीसा प्रकार सध्या पुन्हा चर्चेत आला आहे. एक कॅब चालक आणि प्रवासी महिलेच्या वादाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

कॅब चालक आणि प्रवासी महिलेचा वाद

एक महिला कॅब चालकाला वारंवार मारहाण करत असल्याचा धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. वृत्तानुसार, प्रवासी दारूच्या नशेत होती आणि ड्रायव्हरने तिला गाडीतून बाहेर पडण्यास सांगितले तेव्हा ती तिला अपेक्षित ठिकाणी पोहचली नाही असे सांगत त्याच्याबरोबर वाद घालते. व्हिडीओमध्ये महिला आरडा-ओरडा करताना दिसत आहे. क्लिपमध्ये, कॅब ड्रायव्हर मागच्या सीटवर बसलेल्या एका महिलेला “मला हात लावू नका, मॅडम” म्हणतो. ती मात्र किंचाळते आणि ड्रायव्हरला तिला तिच्या अपेक्षित ठिकाणी नेण्यास सांगते. तो माणूस म्हणतो की, ते तिला अपेक्षित ठिकाणी पोहोचले आहेत, परंतु महिलेने ऐकण्यास नकार दिला आणि ड्रायव्हरला मारहाण करण्यास सुरुवात केली.

Crime NEws
“मी ब्लॅकमेलिंगला कंटाळले होते”, लैंगिक संबंधांदरम्यानच महिलेने केली हत्या!
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
Shocking video a Lady Ran away after hitting a Pedestrian with Scooter in Indonesia
माणुसकी संपली! तरुणीनं रस्त्यानं जाणाऱ्या महिलेला धडक दिली अन् मदत करायची सोडून काय केलं पाहा; संतापजनक VIDEO व्हायरल
Heartbreaking incident betrayed in love young boy jumps into water in jagdalpur chhattisgarh video
“त्या आईचा तरी विचार करायचा रे” गर्लफ्रेंडने फसवल्याने तरुणाचा टोकाचा निर्णय; VIDEO पाहून धक्का बसेल
Mahakumbh Mela Video Viral Women Fight While Traveling To Prayagraj By Train shocking video goes viral
“अरे पाप धुवायला जाताय की करायला?” कुंभमेळ्याला जाताना महिलांनी ट्रेनमध्ये अक्षरश: हद्दच पार केली; VIDEO पाहून बसेल धक्का
Domino Effect Crash Sudden Scooty Brake Causes Multi-Vehicle Pileup Internet Reacts WATCH
“वो स्त्री है कुछ भी कर सकती है…” भररस्त्यात दुचाकीस्वार काकूंनी अचानक मारला ब्रेक, एकमेकांना धडकल्या मागून येणाऱ्या गाड्या, विचित्र अपघाताचा Video Viral
Cab Driver Trending Video us rapper claims driver denied ride
“जाड असणं गुन्हा आहे का?” टॅक्सी चालकाने २२० किलो वजनाच्या महिलेबरोबर काय केलं एकदा पाहाच, VIDEO पाहून तुम्हीही व्यक्त कराल संताप
Rickshaw driver arrested , molesting woman ,
पुणे : प्रवासी महिलेचा विनयभंग करणारा रिक्षाचालक अटकेत

या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाले असून, सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर महिलेच्या वागणुकीवर मोठ्या प्रमाणावर टीका होत आहे.

हेही वाचा – ऐकावे ते नवलच! चक्क जीभने थांबवले ५७ फिरते पंखे! अजब कामगिरीची गिनीज बुकमध्ये नोद , Video पाहून नेटकरी चक्रावले

X वर शेअर करण्यात आलेल्या व्हिडिओमध्ये ही घटना दुबईमध्ये घडल्याचा दावा करण्यात आला आहे.

काय म्हणाले नेटकरी?

काहींनी ही घटना दुबईची नसल्याचा युक्तिवाद केला, तर काहींनी महिलेचा गैरवर्तन केल्याबद्दल निषेध केला. एका व्यक्तीने लिहिले, “ मद्यपान आणि वाद एकत्र योग्य नाही, असे झाल्यास निराश असले तरी त्याचा आदर राखला जात नाही. लोकांनो, शांत राहा!” दुसरा म्हणाला, “हे योग्य नाही. “

कॅब ड्रायव्हर आणि प्रवासी यांच्यातील जोरदार वादावादीच्या व्हिडिओ सोशल मीडियावर नेहमीच समोर येत असतात.. काही महिन्यांपूर्वी कॅब ड्रायव्हरने कॅन्सल केल्यावर महिलेसाठी अपशब्द वापरले होते. या घटनेमुळे नंतर ड्रायव्हरची नोकरी गमवावी लागली, कारण बहुतेक राइड-शेअरिंग प्लॅटफॉर्मने त्याला काम करण्यास बंदी घातली होती. या घटनेने इंटरनेटवर वाद सुरु झाला की ज्यापैकी काही कॅब चालकाची बाजू घेत होते तर काही महिलेची.

हेही वाचा – वर्ष २०२४मध्ये बाबा वेंगाच्या ५ भविष्यवाण्या ठरल्या खऱ्या! २०२५मध्ये जगासमोर कोणते संकट येणार?

दुसऱ्या असंबंधित घटनेत, बंगळुरूचा एक संस्थापक रात्री ३ वाजता स्वत: कार चालवत होता. “काल रात्री ३ वाजता बंगरूळ विमानतळावरून परत येत असताना, मी स्वतःला एका अनपेक्षित भूमिकेत पाहिले: माझ्या कॅबचा ड्रायव्हरला खूप झोप येत होती तो चहा आणि सिगारेटसाठी थांबला पण तरीही डोळे उघडे ठेवू शकत नव्हता. म्हणून, मी त्याला गाडी चालवतो असे सांगितल आणि मला आश्चर्य वाटले की त्याने लगेच मला कारची चावी हातात दिली. ” आयआयएम पदवीधर आणि कॅम्प डायरीज बंगळुरूचे संस्थापक यांनी सोशल मीडिया पोस्टमध्ये लिहिले आणि एक व्हिडिओ शेअर केला

Story img Loader