तुम्हाला जर कोणी विचारले की, तुम्हाला दक्षिण भारतातील कोणता पदार्थ जास्त आवडतो? यावेळी तुम्हीच काय बहुतेक जण डोसा असे उत्तर देतील. डोसा हा दक्षिण भारतातील असा एक पदार्थ आहे जो आपल्या देशातच काय परदेशातही अनेकजण आवडीने खातात. यामुळे देशभरात आपल्याला डोश्याचे अनेक प्रकार पाहायला मिळतात. पण सोशल मीडियावर आता डोसा नाही तर डोसा बनवणारे एक सरदारजी शेफ खूप फेमस होताना दिसत आहेत. कारण त्यांनी अशाकाही हटके अंदाजात डोसा बनवला आहे, जो पाहूनचं अनेकांचे पोट भरेल. त्यांच्या डोसा बनवण्याचा हटके व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.
शेफ मनप्रीत सिंग आहुजा यांनी इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये ते डोसा बनवताना दिसत आहे. यावेळी ते आपल्या मधुर आवाजात डोसा बनवण्याचा आनंद घेत आहे, ज्यामुळे हा व्हिडिओ खास बनवला आहे. डोसा बनवताना हे सरदारजी ‘बार बार देखो, हजार बार देखो, ये हमारा डोसा, डोसा ओ’ असे एक हटके गाणं गाताना दिसत आहेत. हे सुंदर गाणं ऐकल्यानंतर लोकांनी त्याचे खूप कौतुक केले आहे. व्हिडीओ व्हायरल होण्याचे एक कारण म्हणजे डोसा बनवताना त्यांनी स्वच्छतेची पूर्ण काळजी घेतली आहे.
हा व्हिडिओ सरदारजींनी त्यांच्या singh_the_singing_chef या इंस्टाग्राम अकाउंटरून अपलोड केला आहे. व्हिडिओतून त्यांनी गाणं म्हणत, नृत्य करून आणि चेहऱ्यावर आनंद ठेवून अधिक स्वादिष्ट डोसा कसा बनवायचा हे दाखवले आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर एका यूजरने लिहिले की, तुम्ही मुंबईला येऊ शकता. दुसर्या यूजरने लिहिले की, हा इंटरनेटवरील आजचा सर्वात सुंदर व्हिडिओ आहे.