Dosa idli sambar chutney chutney dance video: सोशल मीडियावर दररोज असंख्य व्हिडीओ व्हायरल होताना आपण पाहत असतो. त्यात डान्सच्या व्हिडीओंची संख्या अधिक असते. अगदी लहानग्यांपासून ते वयोवृद्धापर्यंतची मंडळी सोशल मीडियावर थिरकताना दिसतात. प्रसिद्धी किंवा स्वत:च्या आनंदासाठी अनेक लोक मेट्रोत, तर कधी सार्वजनिक ठिकाणी, तर कधी रस्त्यांवर डान्स करताना आपल्याला दिसतात.
सोशल मीडियावर गेल्या काही दिवसांपासून ‘डोसा इडली सांबार चटणी चटणी’ हे गाण जोरदार व्हायरल होतंय. कॉन्टेन्ट क्रिएटर्ससह अभिनेत्री, अभिनेतेदेखील या गाण्यावर रील्स करत डान्स करताना दिसत आहेत. सोशल मीडियावर याआधी ‘गुलाबी साडी’, ‘तौबा तौबा’, ‘तांबडी चांबडी’, ‘मदनमंजिरी’ ही गाणी व्हायरल झाली होती. यावरदेखील अनेकांनी रील्स बनवल्या होत्या.
आता या डोसा इडली या नवीन गाण्याने सगळ्यांना वेड लावलं आहे. अगदी लहानग्यांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळेच या गाण्यावर थिरकताना दिसतायत. सध्या याच गाण्यावर एका मुलीचा तिच्या वडिलांबरोबरचा डान्स व्हिडीओ व्हायरल होतोय. जो पाहून तुम्हीही कौतुक कराल.
लेकीचा वडिलांबरोबर भन्नाट डान्स
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या ‘डोसा इडली सांबार चटणी चटणी’ या गाण्यावर एका बाप-लेकीने जबरदस्त डान्स करत सगळ्यांची मने जिंकली आहे. व्हिडीओमध्ये बाप-लेकीने पारंपारिक दक्षिण भारतीय पोशाख परिधान केला आहे. या गाण्यावर केलेला अभिनय आणि डान्स पाहून नेटकऱ्यांनी त्यांचं मनभरून कौतुक केलं आहे. दोघांनी नेटकऱ्यांचं मनोरंजन करत ही रील शूट केली आहे.
सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडीओ @khushiified या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून याला तब्बल १४.९ मिलियन व्ह्यूज आले आहेत.
युजर्सच्या प्रतिक्रिया
बाप-लेकीचा हा व्हिडीओ पाहून अनेकांनी यावर कमेंट करत आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने कमेंट करत लिहिलं, “तुझे बाबा कसले कुल आहेत.” तर दुसऱ्याने “बाप-लेकीची जोडी जबरदस्त, दोघांनी काय भारी डान्स केला आहे” अशी कमेंट केली. तर एकजण कमेंट करत म्हणाला, “वडिलांनी काय मस्त एक्सप्रेशन दिले आहेत.” तर एकाने “काकांनी तर मुलीपेक्षा भारी डान्स केला”