Viral video: रस्त्यावर धंदा किंवा एखादा व्यावसाय करणं बऱ्याच लोकांना कमीपणाचं काम किंवा लक्षण वाटतं. तुम्हालाही असंच वाटत असेल तर हे चुकीचं आहे. सोशल मीडियावर सध्या एक व्हिडीओ भरपूर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये डोला विकणाऱ्याने त्याची कमाई लोकांना स्वत: सांगितली आहे. त्याने सांगितलेला आकडा ऐकून लोकं तर हैराण झाले आहेत. या डोसेवाल्यानं उच्चशिक्षित नोकरदारांच्या जखमांवर मीठ चोळलं असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. कारण तो म्हणतोय, शिक्षण न घेतल्यामुळेच तो आज इतका श्रीमंत झालाय. या डोसावाल्याची कमाई एकून तुम्हीही थक्क व्हाल..
या डोसा विकणाऱ्या काकांची कमाई ही कॉर्पोरेटसेक्टरमध्ये काम करणाऱ्या लोकांपेक्षा जास्त आहे. होय तुम्हाला विश्वास बसत नसेल तर सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ पाहा. आपल्याकडे ९ ते ६ वेळेत कॉर्पोरेट क्षेत्रात काम करणे म्हणजे आर्थिक स्थिरतेची गुरुकिल्ली मानले जाते कारण त्यांना चांगला पगार असतो आणि मर्यादित वेळेत काम असते पण आता या वैचारिकतेला आव्हान आता हे धंदा करणारे लोक देत आहेत.
व्हिडीओ करणाऱ्या व्यक्तीचा डोसा विक्रेत्याची संवाद साधताना दिसत आहे ज्यामध्ये असे समजते ज्याची, रोजची कमाई अनेक पारंपारिक कॉर्पोरेटमध्ये काम करणाऱ्या व्यक्तीपेक्षा जास्त आहे. तो म्हणतोय, बरं झालं माझं शिक्षण फारच कमी आहे. जास्त शिक्षण घेतलं असतं तर ३०-४० हजार रुपयांची नोकरी करावी लागली असती. पुढे तो काय बोलणार इतक्यात हा व्हिडीओ संपतो. पोस्टमध्ये मात्र ही व्हिडीओ कुठे शूट करण्यात आलाय याचा उल्लेख नाही.
पाहा व्हिडीओ
हेही वाचा >> प्रेमात धोका! बॉयफ्रेंड दुसऱ्या मुलीबरोबर दिसला अन् पुढे नको ते घडलं; VIDEO व्हायरल
डोसावाल्याची कमाई पाहून नेटकऱ्यांना आश्चर्याचा धक्का बसला आहे आणि अनेकांनी त्यांच्या कष्ट आणि मेहनतीचे कौतूक केले आहे. या व्हिडीओवर शेकडो लाईक्स आणि कमेंट्स आल्या आहेत. बहुतांश युजर्स हे त्याची कमाई ऐकून तर हैराणच झाले. ‘ते खूप मेहनत करतात. त्यांना सगळे पदार्थ स्वत: तयार करावे लागतात आणि दिवसभर उभं राहून धंदा करावा लागतो. अशी कमेंट एकाने केली. तर ‘हे प्रचंड कठीण काम आहे. वातावरण कधी खूप गरम असतं, तर कधी थंडगार वारा वाहत असतो, पाऊसही कोसळतो. बऱ्याच वेळेस चोरच पैसे घेऊन पळून जातात. एखाद्या इमारतीत बसून काम करणं सोपं आहे. पण रस्त्यावर उभं राहून डोसा विकणं हे काही खायचं काम नाही’ अशा शब्दांत दुसऱ्या युजरने त्या डोसा विक्रेत्याचं कौतुक केलं.