सध्या देशाची दिल्लीमध्ये उष्णतेमुळे सर्वांचीच वाईट अवस्था झाली आहे. उष्णतेमुळे माणसांचे हाल होत असून, जनावरांचेही मोठे हाल होत आहेत. यंदाचा उन्हाळा पाहता तो सर्व विक्रम मोडेल, असे वाटते. कडक उन्हामुळे आणि उष्ण वाऱ्यामुळे लोकांना घराबाहेर पडणे कठीण झाले आहे. या कडक उन्हासंबंधित सोशल मीडियावर एक व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे.

हा व्हिडीओ सध्या खूप चर्चेत आहे. हा व्हिडीओ हैदराबादचा सांगण्यात येत असून यामध्ये एक व्यक्ती स्कूटीच्या सीटवर डोसा बनवताना दिसत आहे. हे पाहून सोशल मीडिया यूजर्सनाही आश्चर्य वाटले की स्कूटीच्या सीटवर कोणी डोसा कसा बनवू शकतो? मात्र, व्हिडीओ पाहिल्यावर ते अगदी खरे असल्याचे दिसते.

सर्वात आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्या व्यक्तीने स्कूटीच्या सीटवर गॅसच्या स्टोव्हशिवाय फक्त उन्हाचा वापर करून डोसा बनवला. त्याचा व्हिडिओ समोर आल्यानंतर इंटरनेट यूजर्स हैराण झाले आहेत. एक स्कूटी उन्हात उभी असल्याचे दिसते. तिथं एक व्यक्ती येऊन स्कूटीच्या सीटवर डोस्याचे पीठ पसरवतो. जास्त उष्णतेमुळे डोसा शिजल्याचे तुम्ही बघू शकता.

“याला म्हणतात आविष्कार”; झाडावरून फळं तोडण्यासाठी केलेल्या हटके जुगाडामुळे आनंद महिंद्रा झाले प्रभावित

विमानातही असतात हॉर्न्स; जाणून घ्या हे हॉर्न्स नेमके कधी आणि कशासाठी वापरतात

हा व्हिडीओ स्ट्रीटफूड ऑफभग्यानागर नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. तुम्ही पाहू शकता की ती व्यक्ती डोसाही पलटते आणि नंतर दुसऱ्या बाजूने शिजवते. हा व्हिडीओ पाहून लोक आश्चर्यचकित झाले आहेत. त्याच वेळी, अनेक लोक असेही म्हणत आहेत की ही एडिटिंगची कमाल आहे. याआधीही असाच एक व्हिडीओ समोर आला होता. यामध्ये एका व्यक्तीने गच्चीवर, एका पॅनमध्ये केवळ कडक उन्हाच्या मदतीने ऑम्लेट बनवले होते.