वर्णभेदी जाहिरात प्रकाशित केल्यानंतर अखेर डव्ह कंपनीला जाहीर माफी मागावी लागली आहे. दोन दिवसांपूर्वी डव्हने आपल्या अधिकृत फेसबुक पेजवर एक जाहिरात अपलोड केली होती. ही जाहिरात वर्णभेदी आहे अशी टिका मोठ्या प्रमाणात करण्यात आली. अनेकांनी सोशल मीडियावर डव्हविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली. लोकांच्या रोषाला समोरं जावं लागल्यानंतर डव्हने माफी मागत आपली जाहिरात मागे घेतली आहे.
वाचा : मालिकेचा सेट नव्हे, हा तर आध्यात्मिक गुरूंच्या मुलीचा लग्नमंडप
डव्ह लोशनची जाहिरात करताना एक कृष्णवर्णीय महिला आपलं टिशर्ट काढते आणि तिचं लगेच श्वेतवर्णीय महिलेत रुपांतर होतं त्यानंतर अनेक श्वेतवर्णीय महिला या जाहिरातीत दिसतात. लोकांनी नेमका कृष्णवर्णीय महिलेचं श्वेतवर्णीय महिलेत रुपांतर करण्याच्या डव्हच्या मानसिकतेवर आक्षेप घेतला आहे. ‘ही अत्यंत असंवेदनशील आणि वर्णद्वेष दाखवणारी जाहिरात आहे’ अशा शब्दात लोकांनी त्यावर टिका केली आहे. या जाहिरातीवर अनेक माध्यमांनी देखील आक्षेप नोंदवला. अखेर डव्हने ट्विट करत याबद्दल माफी मागितली आहे. ‘या जाहिरातीतून कोणालाही दुखवण्याचा हेतू नव्हता, पण अनावधानाने झालेल्या चुकीची आम्ही माफी मागतो’ असं सांगत डव्हने माफी मागितली आहे.
पण अशाप्रकारे वर्णभेदी जाहिरातीवरून डव्हवर टिका करण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधीही डव्हने जाहिरातीद्वारे अनेकांच्या भावना दुखावल्या होत्या.
An image we recently posted on Facebook missed the mark in representing women of color thoughtfully. We deeply regret the offense it caused.
— Dove (@Dove) October 7, 2017
I read Dove’s statement on Twitter, but have hard time believing whoever conceived this ad didn’t know exactly what they were doing here. pic.twitter.com/nuSc9vzh7E
— Michael Arceneaux (@youngsinick) October 8, 2017