अनिल कांबळे, प्रतिनिधी, नागपूर

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नागपूर या ठिकाणी असलेल्या हिल टॉप भागात गौतमी पाटीलच्या नृत्याचा कार्यक्रम एकता गणेश उत्सव मंडाळाने आयोजित केला होता. गौतमी पाटीलच्या या कार्यक्रमात तुफान राडा झाला. गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात गौतमीचा चेहरा दिसत नाही म्हणून तिथे आलेल्या तरुणांनी गोंधळ घातला आणि राडा केला. काही डझन खुर्च्या या तरुणांनी तोडल्या.

नागपुरात काय घडलं?

नागपुरात नृत्यांगना गौतमी पाटीलच्या लावणी कार्यक्रमात जोरदार हुल्लडबाजी झाली. नागपुरातील हिल टॉप परिसरात एकता गणेशोत्सव मंडळाने शुक्रवारी (२९ सप्टेंबर) गौतमी पाटीलचा लावणीचा कार्यक्रम ठेवला होता. गौतमी पाटील कार्यक्रमासाठी सुमारे दोन तास उशिरा पोहोचली. त्यानंतर तिचं नृत्य सुरु होताच तरुणांनी जोरदार गोंधळ सुरू केला. अनेक तरुण तिथे लावण्यात आलेल्या प्लास्टिकच्या खुर्च्यांवर उभे झाले. त्यामुळे मोठ्या संख्येने प्लास्टिकच्या खुर्च्या तुटल्या. काही हुल्लडबाजांनी तुटलेल्या खुर्च्यांचे तुकडे हवेत भिरकावले.

पोलिसांकडून हुल्लडबाजांवर सौम्य लाठीमार

गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात मागची गर्दी वारंवार समोरच्यांना धक्का देत असल्यामुळे अनेक वेळेला समोरचे बॅरीगेड खाली कोसळले आणि त्यामुळे गर्दीला नियंत्रित करण्यासाठी पोलिसांना सौम्य लाठीमारही करावा लागला.

पोलिसांनी काय म्हटलं आहे?

नागपुरातील हिल टॉप परिसरातील एकता गणेशोत्सव उत्सव मंडळाच्यावतीने नृत्यागना गौतमी पाटील हिचा नृत्याचा कार्यक्रम आयोजित केला होता. त्या कार्यक्रमात काही हुल्लडबाजांनी गोंधळ घातला. काही युवकांनी खुर्च्यांची तोडफोड केली आणि खुर्च्यांचे तुकडे हवेत भिरकावले, त्यामुळे गोंधळ उडाला. कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलिसांनी सौम्य लाठीमार केला. त्यामुळे परिस्थिती नियंत्रणात आली. याप्रकरणी गणेशोत्सव मंडळ किंवा मारामारी करणाऱ्या युवकांकडून कोणत्याही प्रकारची तक्रार आली नाही. त्यामुळे या प्रकरणात कोणत्याही प्रकारचा गुन्हा दाखल करण्यात आला नाही, अशी प्रतिक्रिया अंबाझरी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक गोल्हे यांनी दिली.

गौतमी पाटीलला सबसे कातील गौतमी पाटील असं का म्हटलं जातं?

“सबसे कातील गौतमी पाटील असं माझ्याविषयी म्हटलं जातं हे प्रेक्षकांचं प्रेम आहे. मला या गोष्टीचं खूप समाधान वाटतं, छान वाटतं. माझ्या कार्यक्रमांना आता महिला वर्गही येऊ लागला आहे याचंही बरं वाटतं. प्रेक्षकांनी मला प्रेम दिलं. सबसे कातील गौतमी पाटील असं माझ्याविषयी कायमच ते बोलत असतात. हे सगळं माझ्याविषयीच्या प्रेमापोटीच. या प्रेक्षकांनीच मला इथपर्यंत आणलं आहे. हे त्यांचेच उपकार आहेत.” असं म्हणत गौतमीने याबाबत उत्तर दिलं आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dozens of chairs broken at gautami patils dance event in nagpur mild lathi charge by police to control scj
Show comments