माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांची आज जयंती. डॉ. कलाम यांचा जीवनप्रवास अनेकांसाठी प्रेरणादायी आहे. १५ ऑक्टोबर १९३१ रोजी तामिळनाडूमधील रामेश्वर येथे एपीजे अब्दुल कलाम यांचा जन्म झाला. अब्दुल कलाम यांची भाषणे नेहमीच प्रेरणादायी असतात. त्यांच्या भाषणातील अनेक विचार चांगलेच लोकप्रिय झाले होते. त्यांचं प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व आजही अनेकांना नैराश्यातून, अपयशातून, अडचणींमधून मार्ग काढण्यासाठी दिशादर्शक आहेत. म्हणून आज त्यांच्या जयंतीचं औचित्य साधत डॉ. अब्दुल कलाम यांचे काही निवडक विचार लोकसत्ताच्या वाचकांसाठी.

* आपण झोपेत पाहतो ते खरं स्वप्न नसतं, तर आपली झोप उडवतं ते खरं स्वप्न असतं.

Manoj Jarange Statemet on Namdev Shashtri
Manoj Jarange : मनोज जरांगेंची नामदेव शास्त्रींच्या वक्तव्यावर जोरदार टीका, “जातीयवादाचा नवा अंक…”
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
Myra Vaikul Upcoming Movie Mukkam Post Devach Ghar review
छोट्यांची मोठी गोष्ट
Cancer , positive thinking ,
प्रवास : असाध्यतेकडून साध्यतेकडे
great leaders, Study , Haritatya ,
ऊब आणि उमेद : माझ्यातले हरितात्या…
Transformational Shastri and Original Eccentricity LaxmanShastri Joshi
तर्कतीर्थ विचार: परिवर्तनवादी शास्त्री आणि मौलिक विलक्षणता
Lakshman Shastri Joshi Manusmriti Dahan and Tarkatirtha
तर्कतीर्थ विचार: मनुस्मृती दहन व तर्कतीर्थ
Sturggle Story
“शर्यत धावण्याची असो किंवा आयुष्याची…संघर्ष रडवतो पण इतिहास घडवतो!” चिमुकलीने केलं सिद्ध, Viral Video देतोय जगण्याची प्रेरणा

*देशात सर्वाधिक बुद्धिमत्ता असलेल्या व्यक्ती शक्यतो वर्गातील शेवटच्या बाकावरचं सापडतात.

* तुमच्या पहिल्या विजयानंतर विश्रांती घेऊ नका. कारण, दुसऱ्या प्रयत्नात तुम्ही अयशस्वी झालात तर तुमचा पहिला विजय केवळ नशीबाचा भाग होता, असे म्हणायला अनेकजण सज्ज असतात.

* जेव्हा पाऊस सुरू होतो तेव्हा सर्व पक्षी घरट्यात आसरा घेतात. मात्र, गरूड पावसापासून बचाव करण्यासाठी ढगांवरून उडतो.

* यशाबद्दलची माझी निष्ठा कणखर असेल तर मला अपयशामुळे कधीच नैराश्य येणार नाही.

* यशाचा आनंद अनुभवण्यासाठी व्यक्तीला आयुष्यात अडचणींची सामना करणे आवश्यक असते.

* स्वप्न खरी होण्यासाठी स्वप्नं पाहणं गरजेचं आहे.

* एखाद्याचा पराभव करणे फार सोपे असते. मात्र, एखाद्याला जिंकणे खूपचं अवघड असते.

* आपण आपल्या वर्तमानातील गोष्टींचा त्याग करून जेणेकरून आपल्या मुलांचं भविष्य उत्तम होईल.

* स्वप्ने पहा, त्या दिशेने विचार करा व ती कृतीने सत्यात उतरवा.

* संकुचित ध्येय बाळगू नका. महान विचारदृष्टी समोर ठेऊन परिश्रम केले तर आपला देश निश्चितपणे एक विकसित राष्ट्र बनेल.

* य़शस्वी कथा वाचू नका, त्यांनी केवळ संदेश मिळतो. अपयशाच्या कथा वाचा, त्याने यशस्वी होण्यासाठी कल्पना मिळतात.

Story img Loader