Dr. Ambedkar Jayanti 2023 Motivational Quotes: डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती १४ एप्रिल रोजी भारतासह जगभरात मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. या जयंतीला आंबेडकर जयंती किंवा भीम जयंती म्हणून ओळखले जाते. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म १४ एप्रिल १८९१ रोजी भारतातील महू येथील एका दलित महार कुटुंबात झाला. त्यांना भारतरत्न डॉ.भीमराव आंबेडकर म्हणून ओळखले जाते. ते भारत सरकारच्या सामाजिक न्याय मंत्रालयानुसार ते जागतिक दर्जाचे वकील, समाजसुधारक आणि प्रथम क्रमांकाचे जागतिक दर्जाचे विद्वान होते.
बाबासाहेबांनी आपल्या विचारातून एक संपूर्ण आदर्श समाज बांधणीचे काम केले होते. त्यांचे असेच काही मौल्यवान विचार आज आम्ही आपणांसह शेअर करत आहोत. तुम्ही खाली दिलेले आंबेडकरांचे विचार आपल्या Whatsapp स्टेट्स, इंस्टाग्राम व फेसबुक पोस्ट, स्टोरी,तसेच अन्य सोशल मीडियावरून तुमच्या मित्र व कुटुंबासह नक्कीच शेअर करू शकता.
हे ही वाचा<< डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या भीमसैनिकांसाठी निळा रंग एवढा महत्त्वाचा का? काय आहे संबंध?
लक्षात घ्या, आंबेडकरांचे विचार हे फॉरवर्ड करताना स्वतःमध्ये रुजवल्यास हीच या महामानवास जयंतीनिमित्त विशेष भेट असेल. तुम्हाला सर्वांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा!