Dr. Babasaheb Ambedkar Statue: लाइटहाऊस जर्नलिझमला सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर मोठ्या प्रमाणावर शेअर केल्या जाणाऱ्या वर्तमानपत्राच्या कात्रणाचा फोटो आढळून आला. हिंदी भाषेतील कात्रणात बातमीचे शीर्षक होते, ‘मुस्लिमों की भीड़ ने आंबेडकर की मूर्ति तोड़ी, दलितों को पिटा’ (मुस्लिमांच्या जमावाने आंबेडकरांच्या पुतळ्याची तोडफोड केली आणि दलितांना मारहाण केली). फोटोमध्ये दिसणारा बातमीचा अहवाल ‘अमर उजाला ब्युरो’ने दाखल केला होता. तपासादरम्यान आम्हाला आढळले की ही बातमी खरी आहे पण त्यातून एक मोठं सत्य लपवण्यात आलं आहे. नेमकं हे प्रकरण काय, जाणून घ्या..

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

काय होत आहे व्हायरल?

X उजर Sunil Shukla ने बातमीचे कात्रण आपल्या प्रोफ़ाइल वर शेअर केले.

इतर वापरकर्ते देखील वर्तमानपतराचे कात्रण शेअर करत आहेत.

तपास:

आम्ही हिंदी हेडलाईन कॉपी करून X वर शोधून तपास सुरू केला. आम्हाला आढळले की X वापरकर्त्याने १६ मे २०१९ रोजी ही बातमी पोस्ट केली होती.

त्यानंतर आम्ही हा मजकूर गुगल सर्चद्वारे शोधला. आम्हाला एक लिंक सापडली ज्यात ही बातमी होती.

रहमत अली ने दलित किशोरी से 2 बार की अश्लील हरकत: मुस्लिम गुंडों ने तोड़ी अम्बेदकर मूर्ति, महिलाओं को पीटा

त्याद्वारे आम्हाला amarujala.com या वेबसाईटवर बातमी मिळाली.

https://www.amarujala.com/uttar-pradesh/gorakhpur/ambedkar-statue-broken-in-deoria

हा अहवाल २१ एप्रिल २०१९ रोजी प्रसिद्ध झाला होता. गौरी बाजारातील करजाहा गावातील महुवा भागात ही घटना घडली असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे.

हे ही वाचा<< अश्लील हावभाव, माता भगिनींवरुन शिवीगाळ अमरावतीतील Video व्हायरल; बदनामी मात्र यूपीची, खरं काय ते पाहा

निष्कर्ष: २०१९ मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची तोडफोड केल्याचे सांगणारे वर्तमानपत्रातील कात्रण अलीकडील असल्याचे सांगून व्हायरल झाले आहे. व्हायरल दावे दिशाभूल करणारे आहेत.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dr babasaheb ambedkar statue broken by muslims group dalits were beaten viral newspaper clipping hiding huge fact check here svs