आपल्या उत्पादनांची विक्री करायची असेल किंवा लोकांपर्यंत आपल्या उत्पादनाची जाहिरात पोहोचवायची असेल तर जाहिरात करायलाच पाहिजे. एखाद्या उत्पादनाला जाहिरातीमुळे प्रसिद्धी मिळते पण कधी कधी काही कंपन्या जाहिराती करताना अशा काही चुका करतात की त्यांच्यावर ट्रोल व्हायची वेळ येते. असंच काहीसं पाहायला मिळालं ‘डॉ. लाल पॅथ लॅब’ जाहिरातीबाबत. याचा मोठा फलक कोलकात्याच्या रस्त्यावर लावण्यात आला होता. फलकाचा आकार आणि तो मोक्याच्या ठिकाणी लावल्यामुळे साहाजिकच सगळ्यांच्या नजरा तिथे जात होत्या. पण या जाहिरातीत एक मोठी चूक होती जी सजग नागरिकांच्या पटकन लक्षात आली आणि त्यांनी डॉ. लाल पॅथ लॅबला मोठ्या प्रमाणात ट्रोल करायला सुरूवात केली.
ही जाहिरात पाहून अनेकांच्या लक्षात आलं असेल की जाहिरातीत जी मॉडेल डॉक्टर म्हणून दाखवली आहे तिने एक्स- रे रिपोर्ट जाहिरातीत उलटा पकडलेला दिसत आहे. रिपोर्ट तपासताना डॉक्टरांच्या चेहऱ्यावर हे गांभीर्य असते ते या मॉडेलने हुबेहूब आपल्या चेहऱ्यावर आणलंय. पण त्या नादात आपण रिपोर्ट उलटा धरला आहे हे तिच्याही लक्षात आलं नाही ना ही जाहिरात लावणाऱ्यांच्या. पण सजग प्रेक्षकांनी ही चूक मात्र बरोबर हेरली. या जाहिरातीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर डॉ. लाल पॅथ लॅबने चुकीची माफी मागून हे फलक मागे घेतले असल्याचं सांगितलं. पण तोपर्यंत उशीर झाला होता.
That's bad branding @lalpathlabs , you want your ad to get noticed at the expense of misrepresenting a doctor reading an X-ray? pic.twitter.com/guRfya17gO
— Antony Stanley (@tonymon4u) July 30, 2017