DR. Manmohan Singh Resume Viral: देशाचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचे वयाच्या ९२ व्या वर्षी निधन झाले. गुरुवारी रात्री ९.५१ वाजता दिल्लीतील एम्स रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मनमोहन सिंग यांच्या निधनामुळे आता देशात शोककळा पसरली आहे. दरम्यान, सोशल मीडियाच्या माध्यमातूनही अनेक जण मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली वाहत आहेत. अनेकांनी सोशल मीडिया पोस्टच्या माध्यमातून त्यांच्याबरोबरच्या आठवणींना उजाळा दिला आहे. अशात मनमोहन सिंग यांचा एक कथित बायोडाटा सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यात त्यांच्या शिक्षणापासून ते पंतप्रधान होण्यापर्यंत कोण कोणत्या जबाबदाऱ्या सांभाळल्या, त्या विषयीची माहिती लिहिली आहे; ज्यामुळे त्यांचा हा कथित बायोडाटा चर्चेचा विषय ठरला आहे.

अनेक वापरकर्त्यांनी इन्स्टाग्राम आणि लिंक्डइनवर मनमोहन सिंग यांचा कथित बायोडाटा शेअर केला आहे, जो काही वेळातच खूप व्हायरल झाला आहे. अनेक जण एकमेकांना त्यांचा हा बायोडाटा वाचण्याचा सल्ला देत आहेत. इतका प्रभावी बायोडाटा क्वचितच कोणी पाहिला असेल, असे मत अनेक जण व्यक्त करत आहेत. पण, या व्हायरल बायोडाटाच्या सत्यतेची लोकसत्ता पुष्टी करत नाही.

Rajasthan man takes early retirement to take care of ailing wife, she dies at his farewel
अखेर दैवच ठरले शत्रू! आजारी पत्नीच्या सेवेसाठी सरकारी कर्मचाऱ्याने घेतली निवृत्ती, निरोप समारंभातच पत्नीने घेतला अखेरचा श्वास; हृदयद्रावक Video Viral
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
Boiling water to ice challenge leaves woman with severe burns video goes viral snk 94
नको ते चॅलेंज घेणे पडले महागात! बर्फात उकळते पाणी टाकायला गेली अन्….; थरारक घटनेचा Video Viral
Suresh Dhas on Dhananjay Munde
Suresh Dhas: “प्राजक्ताताई माळीही परळीत येतात…”, परळी पॅटर्नचा उल्लेख करत सुरेश धस यांची धनंजय मुंडेंवर टीका
Ratnagiri, Shivaji Maharaj, historical treasure,
रत्नागिरी : राजापुरातील रायपाटण येथे सापडला शिवकालीन ऐतिहासिक ठेवा
Success story of Jayanti Chauhan
रतन टाटा यांची बिझनेस ऑफर नाकारली आणि वर्षभरात कमावले २३०० कोटी रुपये, वाचा जयंती चौहान यांच्या यशाचं सीक्रेट
Maharashtra assembly elections 2024
इडीने छळले. सत्तेशी जुळले, धन फळफळले
Election Commission, maharashtra Director General of Police, Rashmi Shukla
विश्लेषण : पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांना अखेर निवडणूक आयोगाने का हटविले?

अभिनेता वीर दासनेही माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचा कथित बायोडाटा त्याच्या इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे आणि चाहत्यांना मनमोहन सिंग यांचा बायोडाटा वाचण्याचा सल्ला दिला आहे. वीर याने भावनिक पोस्ट करत माजी पंतप्रधानांप्रती शोक व्यक्त केला आहे.

डॉ. मनमोहन सिंग यांचा बायोडाटा एकदा वाचा-

वीरने इन्स्टाग्रामवर लिहिले आहे की, स्वत:वर एक कृपा करा आणि Google वर डॉ. मनमोहन सिंग यांचा बायोडाटा शोधा आणि वाचा. त्यांचे शिक्षण आणि कर्तृत्व पाहून तुम्हालाही आश्चर्य वाटेल. ऑनलाइन व्हायरल होत असलेल्या आठ पानांच्या बायोडाटामधून मनमोहन सिंग यांनी ऑक्सफर्डमधून घेतलेली अर्थशास्त्रातील डॉक्टरेट पदवी, देशाच्या आर्थिक क्षेत्रातील योगदानासह त्यांचे प्रभावी शिक्षण हायलाइट होते.

शिक्षण-
१९५२ : पंजाब विद्यापीठ, चंदीगडमधून एमए (अर्थशास्त्र) मध्ये प्रथम क्रमांक प्राप्त केला.
१९५४ : सेंट जॉन्स कॉलेज, केंब्रिज येथे उत्कृष्ट कामगिरीसाठी राइट्स पुरस्कार.
१९५५ आणि १९५७ : केंब्रिज विद्यापीठाचे व्रेन्सबरी स्कॉलर.
१९५७ : DPhil (ऑक्सफर्ड), DLitt (ऑनरिस कॉजा); भारताच्या निर्यात स्पर्धात्मकतेवर पीएचडी प्रबंध.

Manmohan Singh Death : माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचा मृत्यू नेमका कोणत्या आजारामुळे झाला? जाणून घ्या लक्षणे अन् उपाय

कामाचा अनुभव आणि पद

१९७१-७२ : परकीय व्यापार मंत्रालयातील आर्थिक सल्लागार.
१९७२-७६ : वित्त मंत्रालयातील मुख्य आर्थिक सल्लागार.
१९७६-८० : भारतीय रिझर्व्ह बँकेचे संचालक; इंडस्ट्रीयल डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडियाचे संचालक.
आशियाई विकास बँकेच्या गव्हर्नर मंडळावर भारतासाठी पर्यायी गव्हर्नर.
IBRD च्या गव्हर्नर बोर्डवर भारतासाठी पर्यायी गव्हर्नर.

नोव्हेंबर १९७६-एप्रिल १९८० : सचिव, वित्त मंत्रालय (आर्थिक व्यवहार विभाग).
अणुऊर्जा आयोगाचे सदस्य : अंतराळ आयोगाचे वित्त सदस्य.
एप्रिल १९८०-१५ सप्टेंबर १९८२ : नियोजन आयोगाचे सदस्य-सचिव.
१९८०-८३ : भारत-जपान संयुक्त अभ्यास समितीच्या भारतीय समितीचे अध्यक्ष.
१६ सप्टेंबर १९८२-१४ जानेवारी १९८५ : भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर.
१९८२-८५ : आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या बोर्ड ऑफ गव्हर्नर्सवर भारतासाठी पर्यायी गव्हर्नर.
१९८३-८४ : पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार समितीचे सदस्य.
१९८५ : भारतीय आर्थिक समितीचे अध्यक्ष.
१५ जानेवारी १९८५-३१ जुलै १९८७ : नियोजन आयोगाचे उपाध्यक्ष.
१ ऑगस्ट, १९८७-१० नोव्हेंबर १९९० : सरचिटणीस आणि दक्षिण आयोगाचे आयुक्त, जिनिव्हा.
१० डिसेंबर १९९०-१४ मार्च १९९१ : पंतप्रधानांचे आर्थिक बाबींचे सल्लागार.
१५ मार्च १९९१-२० जून १९९१ : UGC चे अध्यक्ष.


२१ जून १९९१-१५ मे १९९६ : केंद्रीय अर्थमंत्री. ऑक्टोबर १९९१ : आसाममधून
काँग्रेसच्या तिकिटावर राज्यसभेवर निवडून आले.
जून १९९५ : राज्यसभेवर पुन्हा निवडून आले. १९९६ पासून अर्थ मंत्रालयाच्या सल्लागार समितीचे सदस्य.
१ ऑगस्ट १९९६-४ डिसेंबर १९९७ : वाणिज्य संसदीय स्थायी समितीचे अध्यक्ष.
२१ मार्च १९९८ पासून : राज्यसभेतील विरोधी पक्षनेते.
५ जून १९९८ पासून : वित्त समितीचे सदस्य.
१३ ऑगस्ट १९९८ पासून : नियम समितीचे सदस्य. ऑगस्ट १९९९-२००१ : २००० पासून विशेषाधिकार समितीचे सदस्य : भारतीय संसदीय गटाच्या कार्यकारी समितीचे सदस्य.
जून २००१ : राज्यसभेवर पुन्हा निवडून आले.
२००४-२०१४ : भारताचे पंतप्रधान.
२०२४ : राज्यसभेतून निवृत्त.

Story img Loader