Gudhi Padwa 2023 : हिंदू नववर्षाची सुरुवात गुढीपाडव्यापासून होते. विशेषतः महाराष्ट्रात गुढीपाडव्याच्या सणाचा उत्साह पाहायला मिळतो. वेदांग ज्योतिष या ग्रंथात सांगितलेल्या साडेतीन मुहूर्तांपैकी हा एक मुहूर्त आहे. नवीन वर्षाच्या स्वागतासाठी सर्वजण घरोघरी गुढ्या उभारतात. यादिवशी गुढीच्या बाजुला तसेच दाराबाहेर रांगोळी काढली जाते. प्रत्येक गृहिणीली, स्त्रीला आपल्या दारातली रांगोळी ही छान आणि हटके अशी हवी असते. आपला कोणताही सण रांगोळीशिवाय पूर्ण होत नाही. तुम्हालाही गुढीपाडव्यानिमित्त दारात सगळ्यापेक्षा हटके रांगोळी काढायची असेल तर आम्ही तुमच्यासाठी रांगोळीच्या काही सोप्या आणि हटके डिझाईन्स घेऊन आलो आहोत.
हिंदू धर्मात रांगोळीचे खूप महत्व आहे. प्रत्येक शुभ प्रसंगी रांगोळी काढली जाते, गुढीपाडवा हा दिवस सर्वांसाठी खास असतो त्यामुळे सजावट, सुंदर रांगोळी आणि गुढी उभारण्यापासून सर्व गोष्टी सणाचा उत्साह आणखी वाढवता, आम्ही रांगोळीचे काही व्हिडीओ घेऊन आलो आहोत, त्यामुळे तुमचे काम आणखी सोपे होणार यात काही शंका नाही. chaitali_art_n_crafts या अकाऊंटवर गुढीपाडव्यानिमित्त खास रांगोळीचा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे.
पाहा रांगोळी व्हिडीओ –
हेही वाचा – गुढीपाडव्याचा खास बेत, घरच्या घरी तयार करा हे ‘आंबट-गोड’ वरण; जाणून घ्या सोपी रेसिपी
रांगोळीमध्ये असंख्य प्रकार आहेत. ठिपक्यांची रांगोळी, मोराची सोपी रांगोळी, फुलांची रांगोळी अश्या विविध रांगोळी तुम्ही यंदा काढू शकतात. यासोबतच गुढीपाडव्यानिमित्त पारंपारिक संस्कार भारती रांगोळी यंदा तुम्ही दाराबाहेर किंवा गुढी उभारलेल्या परिसरात काढू शकता.