“तुला मोठे झाल्यावर काय व्हायचे आहे?” असा प्रश्न तुम्हाला लहानपणी कोणी तुम्हाला विचारले आहे का. आपल्यापैकी काहीजण डॉक्टर, काहीजण शिक्षक, काहीजण पोलिस अशी उत्तर देत असे. अनेकांना फक्त पैसे कमावायचे असतात पण त्यासाठी फार अभ्यास करायचा नसतो किंवा कसलेही कष्ट नको असतात अशा लोकांना दिवसभर झोपण्यासाठी पैसे कमावण्याचे स्वप्न असते. ही फक्त अनेकांच्या मनातील कल्पना होती त्यामुळे प्रत्यक्षात अशी कोणतीही नोकरी मिळेल असे कोणालाही वाटले नसावे. पण तुम्हाला हे ऐकून धक्का बसेल की अशी नोकरी खरचं अस्तित्वात आहे. होय तुम्ही योग्य तेच ऐकत आहात.
ना कामाचा ताण ना कशाची चिंता, नोकरी असावी तर अशी
बंगळुरूमधील एका डिस्प्ले ट्रकमध्ये एका माणसाला गादीवर शांतपणे झोपल्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. पण प्रत्यक्षात ही गादीची जाहिरात असून त्या गादीवर झोपण्यासाठी त्या व्यक्तीला झोपण्याचे पैसे मिळाले आहेत हे ऐकल्यानंतर लोकांना त्यांच्या डोळ्यांवर विश्नास बसत नाहीये. व्हिडिओ शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, बंगळुरूमध्ये माझ्या स्वप्नातील नोकरी.” व्हिडीओमध्ये दिसते की, डिस्प्ले ट्रक एका लहान खोलीसारखा डिझाइन केलेला आहे, ज्यामध्ये बेड त्यावर गादी, एअर कंडिशनिंग आणि टेलिव्हिजन आहे.
बंगळुरूमधील एका अज्ञात रस्त्यावरून जाणाऱ्या एका व्यक्तीने टिपलेला हा व्हिडिओ ऑनलाइन अनेकांचे लक्ष वेधून घेत आहे.
व्हिडिओ पहा:
नेटकऱ्यांनी हवी ही नोकरी
“बंगळुरू डायरीज” अकाउंटने इंस्टाग्रामवर अपलोड केलेल्या या व्हिडिओला आधीच चार दशलक्षाहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत आणि कमेंट सेक्शन पाहण्यासारखे आहे.
एका वापरकर्त्याने लिहिले, “ येथे अनपेड इंटर्नशिप सुद्धा करायला तयार आहे मी”
दुसऱ्या व्यक्तीने ३ इडियट्समधील संवाद वापरला: “पापा पैसे कम मिलेंगे पर मै खुश राहूंगा पापा (पापा, मला चार पैसे कमी मिळतील पण मी आनंदी राहीन).”
तिसऱ्या व्यक्तीने म्हटले, “ही मार्केटिंग तंत्र आहे. उत्पादन आणि त्यातून मिळणारा फायदा दाखवण्याची थेट उदाहरणे.”
चौथ्या व्यक्तीने लिहिले, “तो कदाचित रात्रीच्या शिफ्टमध्ये काम करणारा कर्मचारी आहे जो हा अर्धवेळ काम करतो.”
अलिकडेच, बेंगळुरूच्या एका महिलेने तिची स्वप्नातील नोकरी ऑनलाइन शेअर केल्यामुळे व्हायरल झाली. मोनालिका पटनायकने X वर लिहिले, “माझे स्वप्नातील काम म्हणजे बंगळुरूमध्ये पीजी मालक बनणे, काहीही न करणे, दर महिन्याच्या शेवटी भाडे मिळवणे आणि सुरक्षा ठेव परत न करणे.”