Drinking from red color cup can lower sugar intake : गोड पदार्थ कुणाला आवडत नाही, अशी लोकं अगदी बोटावर मोजण्याइतकी सापडतील. चहा, कॉफी, सरबतं यांमध्ये साखर घातली नसेल, गोडवा नसेल तर ते पदार्थ पिणे मुश्कील होते. मात्र, आपल्या आहाराची, आरोग्याची काळजी घेण्यासाठी अनेक जण साखर किंवा साखरेचे पदार्थ खाण्याचे टाळतात. विशेषतः चहा-कॉफीतील साखर कमी करण्याचा प्रयत्न करत असतात. मात्र, अचानक एखादी सवय सोडणे फारच कठीण असते.

यासाठी इन्स्टाग्राम या सोशल मीडियावरील दीपशिखा जैन नावाच्या व्यक्तीने तिच्या fries.to.fit या अकाउंटवरून साखरेवर नियंत्रण ठवण्याचा एक अजब असा उपाय सांगितला आहे. दीपशिखाच्या इन्स्टाग्राम प्रोफाइलनुसार ती एक आहारतज्ज्ञ असल्याचे समजते. तिच्या म्हणण्यानुसार, जर तुम्हाला आहारात साखर नियंत्रित करायची असेल, तर त्यासाठी चहा किंवा कॉफी लाल रंगाच्या कपात प्यायल्याने फायदा होऊ शकतो.

Is Dandelion Tea Really Beneficial
कंबरदुखीपासून सुटका मिळवण्यासाठी डँडेलियन चहा खरंच फायदेशीर आहे का? वाचा, तज्ज्ञांचे मत…
Manoj Jarange Patil on Kalicharan
‘हिंदुत्व तोडणारा राक्षस’, कालीचरण यांच्या विधानानंतर मनोज जरांगे…
Little Boy Viral Video
“तू मोठा झाल्यावर किती बायका करणार?” चिमुकल्यानं दिलं भन्नाट उत्तर; ऐकून तुम्हीही पोट धरुन हसाल; VIDEO एकदा पाहाच
Who will understand the pain of parents
“आई वडिलांचे दु:ख कोण समजून घेणार” चिमुकल्याने सांगितले आई बाबांना वेळ देण्याचे दोन फायदे, VIDEO होतोय व्हायरल
do you know advantage of pressing red button in pune
पीएमटी बसमधील या लाल बटणाचा काय उपयोग आहे? VIDEO होतोय व्हायरल
Viral video of a woman falling from an escalator due to feeling dizzy
सरकत्या जिन्यांवर चढली अन् करू लागली विचित्र प्रकार, शेवटी दोन माणसं आली अन्…, VIDEO मध्ये पाहा नेमकं काय घडलं?
Kitchen jugad video orange peel and milk scrub for tanning skin
Kitchen Jugaad: दुधात संत्र्याची साल टाकताच कमाल झाली; Video पाहाल तर दररोज कराल हा उपाय
dudhi barfi recipe
अवघ्या काही मिनिटांत बनवा दुधी भोपळ्याची पौष्टिक बर्फी; वाचा साहित्य आणि कृती…

हेही वाचा : पाठीवरील पुरळाने केलंय तुम्हाला हैराण? Back acne कमी करण्यासाठी पाहा हे घरगुती उपाय….

पण, असे होण्यामागचे नेमके कारण काय आहे?

“ज्यांना चहा किंवा कॉफी यांसारख्या पेयांमधून साखरेचे प्रमाण नियंत्रित ठेवायचे आहे, त्यांनी लाल रंगाच्या कपातून चहा-कॉफी प्यावी”, असे दीपशिखाने तिच्या इन्स्टाग्राम व्हिडीओमध्ये सांगितले आहे. यामागचे कारण स्पष्ट करताना तिने रंग आणि चवींचा एकमेकांशी संबंध जोडून दाखवलेला आहे. त्यामध्ये लाल रंग हा साधारण स्ट्रॉबेरी, डाळिंब यांसारख्या फळांशी जोडला जाऊ शकतो. त्यामुळे जेव्हा तुम्ही चहा किंवा कॉफी लाल रंगाच्या कपमधून पिता तेव्हा मेंदू नकळत त्या रंगाचा संबंध फळांशी लावून, कपातील पेय हे अधिक गोड लागण्यास मदत करत असतो. परिणामी, आपोआपच व्यक्तीचे साखर सेवनाचे प्रमाण कमी होऊ शकते.

लाल रंगाव्यतिरिक्त अजून कोणते रंग गोड चवीशी जोडले जातात?

दीपशिखाने लाल रंग आणि गोड चवीचा संबंध जोडल्यानंतर, हिरव्या आणि पांढऱ्या रंगाचेदेखील उदाहरण दिले आहे. त्यापैकी “हिरवा रंग हा आंबट फळे किंवा हिरव्या मिर्चीसह जोडला जातो; तर पांढरा रंग हा कडू चवीसह किंवा कांदा, लसूण यांसारख्या पदार्थांसह जोडला जातो”, असे दीपशिखा म्हणते. तसेच, राष्ट्रीय आरोग्य संस्था (NIH) देखील गोड चवीचा संबंध निळ्या किंवा जांभळ्या रंगाशी जोडत असल्याचे एनडीटीव्हीच्या एका लेखावरून समजते.

हेही वाचा : थंडगार मटका कुल्फी! पाहा कसा तयार होतो हा गारेगार पदार्थ; व्हायरल Video घडवेल बालपणाची सफर!

परंतु चहा, कॉफीमधील साखरेचे सेवन कमी करण्यासाठी सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या आगळ्यावेगळ्या उपायावर नेटकरी काय म्हणत आहेत ते पाहू.

“पण, मी तर स्टीलच्या कपातून चहा पिते.. मग मी काय करू?” असे एकाने विचारले आहे. “मला तर लाल रंग मिरचीची आठवण करून देतो”, असे दुसऱ्याने म्हटले आहे. “वाह! हे मला माहीत नव्हतं”, असे तिसऱ्याने लिहिले आहे. “वाह! कलर थेरपीचा उपयोग अन्नपदार्थांवर होऊ शकतो”, असे चौथ्याने लिहिले आहे.

इन्स्टाग्रामवर @fries.to.fit ने शेअर केलेल्या या व्हिडीओला आत्तापर्यंत १३१K इतके व्ह्यूज मिळाले आहेत.