सध्या सोशल मीडियावर एका भयानक घटनेचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एक ड्रायव्हर पोलिसांपासून स्वत:चा बचाव करण्यासाठी भरधाव वेगाने गाडी चालवताना दिसत आहे. पोलिसांपासून वाचवण्यासाठी ड्रायव्हर रस्त्यावरून चालणाऱ्या लोकांना चिरडत गाडी पळवत असल्याचं व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसत आहे. मात्र, अखेर या कार चालकाला पोलिसांनी मोठ्या धाडसानं पकडल्याचंही व्हिडीओत दिसत आहे. या संपूर्ण थरारक घटनेचा व्हिडीओ रस्त्यावर लावण्यात आलेल्या सीसीटीव्हीमध्ये कैद झाला असून तो सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
रस्त्यावरुन चालणाऱ्या लोकांना चिरडलं –
व्हायरल होत असलेली ही घटना अमेरिकेतील अटलांटा येथील असल्याचं सांगितलं जात आहे. या घटनेतील ड्रायव्हर त्याची गाडी रस्त्यावर निष्काळजीपणे पळवत असल्याचा आरोप त्याच्यावर करण्यात आला आहे. पोलिसांनी निष्काळजीपणे वाहन चालविणाऱ्या ड्रायव्हरला पकडण्याचा प्रयत्न केला असता त्याने पोलिसांपासून आपला बचाव करण्यासाठी भरधाव वेगाने कार पळवली. यावेळी त्याने रस्त्यावरुन चालणाऱ्या लोकांच्या जीवाची पर्वा न करता त्यांना चिरडलं.
पोलिसांनी धाडसाने ड्रायव्हरला पकडलं-
रस्त्यावरून चालणारे लोक या चालकापासून स्वत:चा बचाव करण्यासाठी इकडे तिकडे धावतना व्हिडिओमध्ये दिसत आहेत. यावेळी पोलीस त्या ड्रायव्हरच्या गाडीचा मोठ्या धाडसाने पाठलाग करुन त्याला अडवतात आणि एक पालीस थेट ड्रायव्हरकडे बंदूक रोखतो आणि त्याला ताब्यात घेतो. या घटनेचा व्हिडीओ @MyLordBebo नावाच्या ट्विटर अकाउंटवरुन शेअर करण्यात आला आहे. जो सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय.