Ambulance Accident Video: जेव्हा जेव्हा कोणी आजारी पडते किंवा अपघात होतो तेव्हा प्रथम रुग्णवाहिका बोलावली जाते. रुग्णाला उपचारासाठी रुग्णालयात घेऊन जाण्यासाठी रुग्णवाहिका वेगाने निघून जाते, पण जेव्हा रुग्णवाहिकाच अपघाताचा बळी ठरते तेव्हा काय होते? खरंतर, सोशल मीडियावर एक व्हिडीओ खूप व्हायरल होत आहे, ज्यामध्ये रुग्णवाहिका चालक इतका घाईत होता की तो रुग्णालयात पोहोचताना ब्रेक लावायला विसरला, त्यानंतर जे घडले ते पाहून तुमचेही डोके फिरेल.
रुग्णवाहिकेचा व्हिडीओ व्हायरल
“अति घाई संकटात नेई”, हे वाक्य आपण अनेकदा वाचलं किंवा ऐकलं असेल, म्हणून उशीर होत असला तरी घाई न करता सुरक्षित प्रवास करावा असं सांगितलं जातं. तरीही लोक आपलंच खरं करतात आणि अडचणीत सापडतात. रस्त्यावर वाऱ्याच्या वेगाने गाडी चालवताना काही जणांना आजूबाजूच्या गोष्टींचं भानच नसतं आणि हेच कारण अनेक अपघातांना पुरेसं ठरतं. सध्या सोशल मीडियावर एका अशाच अपघाताचा व्हिडीओ व्हायरल होतोय, ज्यात भरधाव वेगात येणारी ॲब्युलन्स थेट रुग्णालयाच्या ट्रॉमा सेंटरमध्ये घुसते.
व्हायरल व्हिडीओमध्ये असे दिसून येते की, एक रुग्णवाहिका रुग्णालयाकडे वेगाने जात आहे, त्या रुग्णवाहिकेची तिथे उभे असलेले लोक आणि पोलिस आधीच वाट पाहत असल्याचे दिसत आहेत. व्हिडीओमधील सुरक्षा व्यवस्था पाहता असे दिसते की, रुग्णवाहिकेत एक व्हीआयपी आहे, यामुळेच चालक रुग्णाला लवकरात लवकर रुग्णालयाच्या गेटवर नेण्याचा प्रयत्न करत आहे.
ही रुग्णवाहिका गेटवर थांबण्याऐवजी थेट ट्रॉमा सेंटरकडे जाताना दिसते. रुग्णवाहिका रुग्णालयाच्या ट्रॉमा सेंटरकडे जाताना पाहून सर्व जण तिथून दूर जातात, रुग्णवाहिका थेट जाऊन रुग्णालयाच्या ट्रॉमा सेंटरमध्ये घुसते; याचा अर्थ ड्रायव्हरने ब्रेक लावला नाही आणि रुग्णवाहिकेला अपघात झाला. रुग्णवाहिकेशी झालेल्या धडकेमुळे रुग्णालयाचे गेट पूर्णपणे तुटले, अन्यथा मोठी दुर्घटना घडू शकली असती. तिथे उपस्थित असलेल्या लोकांनी रुग्णवाहिका कशीतरी मागे ढकलली. व्हिडीओमध्ये असे दिसून येते की चालक खूप घाबरलेला आहे. यानंतर लोकांनी रुग्णवाहिकेचा दरवाजा उघडला आणि त्याला बाहेर काढले, पण तो क्षणभरही तिथे न थांबता पळून गेला.
येथे पाहा व्हिडीओ
हा व्हिडीओ पाहिल्यानंतर सोशल मीडियावरून भन्नाट प्रतिक्रिया येत आहेत. एक युजर म्हणतो की, “रुग्णालयाजवळ पोहोचल्यानंतरही रुग्णवाहिका इतक्या वेगाने का जात राहिली, अशी घाई का होती;” तर दुसरा म्हणतो, “त्यात कोण बसले होते, ज्यामुळे ड्रायव्हर इतका घाईत होता की तो ब्रेक लावायला विसरला.” तर तिसऱ्या युजरने लिहिलं, “डॉक्टर रुग्णवाहिका चालवत होते का?” चौथ्या युजरने म्हटले, “चालकाने ब्रेक का दाबला नाही”, सध्या हा व्हिडीओ खूप व्हायरल होत आहे आणि लोक त्यावर विविध प्रकारच्या कमेंट्सदेखील करत आहेत.