‘आज प्रचंड गरम होतय’, हे वाक्य ऐकू येत नाही असा दिल्लीतल्या लोकांचा सध्या एकही दिवस जात नसेल. दिल्लीतील तापमान वाढल्याचे तुम्ही ऐकले, वाचले असेल. या उष्णतेपासून सुटका मिळवण्यासाठी प्रत्येकजण स्वतःचा काही पर्याय शोधून काढतो. असाच एक पर्याय सध्या व्हायरल होत आहे. वाढलेल्या तापमानापासून सुटका मिळवण्यासाठी दिल्लीतील एका रिक्षाचालकाने रिक्षावरच बाग तयार केली आहे. या अनोख्या कल्पनेचा फोटो सध्या व्हायरल होत आहे.
भारतीय प्रशासकीय सेवेत कार्यरत असणाऱ्या अधिकारी सुप्रिया साहू यांनी रिक्षावर बाग तयार केल्याचा फोटो ट्विटरवर शेअर केला आहे. त्यांनी या फोटोबरोबर ‘इंडिया गेट, दिल्ली इथला हा फोटो माझ्या फ्रेंडने क्लिक केलेला आहे. या रिक्षाचालकाचे नाव महेंद्र कुमार असून, वाढलेल्या तापमानापासून स्वतःचे आणि प्रवाशांचे रक्षण करण्यासाठी या व्यक्तीने रिक्षावर बाग तयार केली आहे. एसीला पर्याय ठरणारी ही कल्पना आश्चर्यकारक आहे.’ असे कॅप्शन त्यांनी दिले आहे. पाहा त्यांनी शेअर केलेला फोटो.
सुप्रिया साहू यांचे ट्वीट :
वाढत्या तापमानापासून स्वतःची सुरक्षा करण्यासाठी रिक्षावरच बाग तयार करण्याची ही कल्पना नेटकऱ्यांना आवडली असून, अनेकजणांनी यावर कमेंट करत रिक्षावाल्याच्या अनोख्या कल्पनेचे कौतुक केले आहे.