वाहन चालवताना नेहमी सजग रहावे लागते. कधी कोणती परिस्थिती समोर येईल सांगता येत नाही. परिस्थिती कितीही वाईट असली तरी संकटातून स्वत:ला बाहेर काढण्यासाठी खूप धाडस लागते. अनेकदा चूक एकाची असते आणि नुकसान मात्र दुसऱ्याचे होते. असाच काहीसा प्रकार नुकताच व्हायरल झालेल्या अपघातामध्ये घडला आहे. कार चालकाची काहीही चूक नसताना त्याचा जीवाला धोका निर्माण झाला. कार चालकाच्या प्रंसगवधानामुळे त्याचा चीव वाचला पण कारचे मात्र खूप नुकसान झाले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

युटाहमधील लेटन येथे एका भयानक अपघात कॅमेऱ्यात रेकॉर्ड झाला आहे. व्हिडिओ एका रेल्वे फाटकाजवळील आहे जिथे हा अपघात होतो. भरधाव वेगात येणार्‍या ट्रेनने एका एसयूव्ही कारला उडवल्याचा थरारक क्षण व्हिडीओमध्ये दिसत आहे. दरम्यान ट्रेनने कारला धडकण्यापूर्वीच कार चालक आपला जीव कसा वाचवतो हे पाहून नेटकऱ्यांच्या अंगावर काटा उभा राहिला आहे.

मंगळवारी दुपारी ही घटना घडली जेव्हा चालकची पांढऱ्या एसयूव्हीला दुसऱ्या वाहनाने धडक दिल्याने रेल्वे रुळांवर ढकलले. त्याचवेळी दोन्ही बाजूचे रेल्वे फाटक खाली गेल्याने त्याला ना पुढे जाता येत होते ना मागे जात होते. ट्रेन रुळावर येत असल्याचे चेतावणी देणारे दिवे चमकताना दिसत आहे हे पाहून चालक तातडीने कार मधून उतरतो आणि कार तिथेच सोडून दूर जाऊन थांबतो. भरधाव वेगाने ट्रेन येते आणि कारला जोरदार धडक देते. कार जोरात रेल्वे फाटकावर जाऊन आदळते. धडक इतकी जोरात असते की, कारचा चक्काचूर होताच पण रेल्वेफाटकही तुटून पडते. परंतु बॅरियरमुळे त्यांचा मार्ग अडवला जात असल्याने एसयूव्हीची पुढची चाके अजूनही रुळांवर अडकली होती.

कॉलिन रग (@CollinRugg )यांनी एक्सवर शेअर केलेला हा थरारक व्हिडिओ नऊ दशलक्षांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. व्हिडिओवर नेटिझन्सची प्रतिक्रिया चालकने गाडी पुढे का हलवली नाही यावर होती.

एका वापरकर्त्याने लिहिले, “त्याने थेट गाडी पुढे चालवली असती तर योग्य ठरले असते.” दुसर्‍या वापरकर्त्याने लिहिले, “त्यांनी गाडी पुढे का नेली नाही? मी काही चुकीचे पाहिले का?”

एका वापरकर्त्याने चालकाच्या बचाव करत लिहिले की,, “तुम्ही असे गृहीत धरत आहात की, त्यांना काय चालले आहे याची पूर्ण जाणीव होती. ते फक्त मागून आले आहेत आणि त्यांच्याभोवतीची माहिती खूप लवकर बदलत आहे. तुमचे मन एक-दोन पावले मागे असताना वेगाने बदलणाऱ्या परिस्थितीत तुम्ही कसे निर्णय घेते?

केएसएल-टीव्हीशी बोलताना, यूटीएचे सार्वजनिक माहिती अधिकारी गॅव्हिन गुस्टाफसन यांनी या घटनेत कोणीही जखमी झाले नाही याबद्दल समाधान व्यक्त केले, असे फॉक्स न्यूजने म्हटले आहे. त्यांनी कबूल केले की, बाहेरील व्यक्तीच्या दृष्टिकोनातून, हे स्पष्ट वाटू शकते की चालकने एकतर पुढे गाडी चालवली असावी किंवा गेट तोडून आत जावे. पण, गुस्टाफसन यांनी नमूद केले की, चालकाला त्या क्षणी धक्का बसला असावा, ज्यामुळे त्यांच्या प्रतिसादावर परिणाम झाला. या अपघातामुळे ट्रेनचे मोठे नुकसान झाले, दुरूस्तीचा खर्च $१००,००० पेक्षा जास्त असल्याचा अंदाज आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Driver jumps from suv seconds before train smashes into it viral video captures heart stopping escape snk