Misuse Of Ambulance Siran Video Viral : हैदराबादमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. रुग्णांना उपचारासाठी वेळेत रुग्णालयात दाखल करता यावं, यासाठी रुग्णवाहिकेच्या सायरनचा वापर करून प्रवास केला जातो. मात्र, रुग्णवाहिकेच्या चालकाने नाश्ता करण्यासाठी जायचं असल्याने ट्रॅफिकमध्ये रुग्णवाहिकेचा सायरन वाजवला आणि रस्त्याच्या बाजूला नाश्ता करण्यासाठी एका हॉटेलमध्ये थांबला. हा धक्कादायक प्रकार पोलिसांना कळताच पोलिसांनी त्या वाहनचालकावर दंडात्मक कारवाई केली.

एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने दिलेली माहिती अशी की, “रुग्णवाहिका बशीरबाग जंक्शन येथून जात असताना ही घटना घडली. चालकाने सायरन वाजवल्याने ट्रॅफिक पोलिसांनी त्या रुग्णवाहिकेला पुढे जाण्यासाठी मार्ग काढून दिला. वाहतूक पोलिसांना वाटलं की ही एक एमरजन्सी आहे. परंतु, त्यांनी पाहिलं की, रुग्णवाहिका ट्रॅफिक सिग्नलपासून जवळपास १०० मीटर अंतरावर एका हॉटेलजवळ पार्क करण्यात आलीय. त्यानंतर पोलिसांनी चालकाची चौकशी करताना त्याचा व्हिडीओ कॅमेरात कैद झाला.” चालकाचा हा व्हिडीओ आयपीएस अधिकारी अंजनी कुमार यांनी ट्वीटरवर शेअर केला आहे.

Kurla accident case CCTV from bus seized Mumbai news
कुर्ला अपघात प्रकरणः बसमधील सीसीटीव्ही ताब्यात, २५ जणांचा जबाब नोंदवला
nana patekar reacts on allu arjun arrest
अल्लू अर्जुनच्या अटक प्रकरणावर नाना पाटेकर म्हणाले, “कोणाला…
Thane Police begins work to record statement of former Director General of Police Sanjay Pandey
माजी पोलीस महासंचालक संजय पांडे यांचा जबाब नोंदविण्याचे काम ठाणे पोलिसांकडून सुरू
cyber criminals come with scam idea which is Wedding Invitation Scam
‘वेडिंग इन्व्हिटेशन स्कॅम’ सायबर भामट्यांचा नवा फंडा; सावध राहा, अन्यथा…
senior citizen cheated , Crime case against cyber thieves,
पुणे : अटकेची भीती दाखवून ज्येष्ठाची फसवणूक, सायबर चोरट्यांविरुद्ध गुन्हा
Hyderabad Police
Hyderabad : चोरांचा प्रताप, रुग्णवाहिका चोरली अन् बचावासाठी लढवली अनोखी शक्कल; पोलिसांनी केला सिनेस्टाईल पाठलाग
filght Footage
विमानात नको त्या अवस्थेत सापडले जोडपे! Video झाला व्हायरल, क्रू सदस्यांची चौकशी सुरू, नेटकऱ्यांचा संताप
cyber crimes loksatta news
पुणे : सायबर चोरट्यांच्या जाळ्यात नागरिक; सव्वा कोटींची फसवणूक

नक्की वाचा – Tiger Video : नांगरणी करत असताना शेतकऱ्यासमोर आला खतरनाक वाघ अन् शेतात घडलं…

इथे पाहा व्हिडीओ

पोलीस उपायुक्त राहुल हेगडे यांनी पीटीआयशी बोलताना म्हटलं की, “ही एक आपात्कालीन परिस्थिती नव्हती. रुग्णवाहिकेच्या चालकाने सायरनचा गैरवापर केला नाही पाहिजे. जर ही एक आपात्कालीन परिस्थिती होती, तर त्याला रुग्णालयात जायला पाहिजे होतं. त्याने तसं केलं नाही आणि रस्त्याच्या बाजूला नाश्ता करण्यासाठी थांबला. याच कारणासाठी त्याने सायरन वाजवला. आम्ही रुग्णालय प्रशासनालाही सूचना देणार आहोत की, अशा प्रकारे वारंवार नियमांचं उल्लंघन होत असेल, तर त्यांच्याविरोधात कायदेशीर कारवाई केली जाईल.”

Story img Loader