Accident video: तुम्ही अनेकदा ऐकलं असेल आणि पाहिलंही असेल की लोक गाडी चालवताना डुलकी घेण्यास सुरुवात करतात. झोपेमुळे डोळे जड होतात आणि अनेकदा अशा परिस्थितीत झोप लागल्यास मोठे अपघातही होण्याची शक्यता असते. अशा स्थितीत वाहनचालकांना झोप चांगली झाल्यावरच गाडी चालवण्याचा सल्ला दिला जातो. मात्र, आजकाल एक व्हिडीओ चर्चेत आहे, ज्यामध्ये गाडी चालवताना ड्रायव्हरचा डोळा लागला आणि घात झाला. हा व्हिडीओ पाहून सगळेच आश्चर्यचकित झाले.

एक डुलकी मृत्यूची!

Shocking video Man beat up girlfriend on road video goes viral on social media
“हे कसलं प्रेम? घरी आई-वडिलांचा एक शब्दही ऐकून न घेणाऱ्या मुली बॉयफ्रेंडचा मार कसा खातात?” धक्कादायक VIDEO व्हायरल
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Shocking video pune A Guy in Car attacked by 3 Youths on Scooter Pune street video goes viral
पुण्यात गुंडगीरी संपेना; कार चालकाचा पाठलाग केला शिवीगाळ केली अन्…VIDEO पाहून तुम्हीच सांगा या तरुणांचं करायचं काय?
a young guy express his feelings about todays marriage
Video : “आजच्या काळातला हुंडा म्हणजे…” तरुणाने सांगितली लग्नाची सत्य परिस्थिती, पुणेरी पाटीचा व्हिडीओ चर्चेत
Taloja MIDC road accident
Video : तळोजातील अपघातामध्ये एक ठार, महिला अत्यवस्थ
Taloja MIDC road accident
भरधाव मोटार उलटून तरुणीचा मृत्यू; मुंबई-बंगळुरू बाह्यवळण मार्गावर अपघात; सात जण जखमी
Navi Mumbai Accident
VIDEO : विरुद्ध दिशेने वाहन चालवणं नवी मुंबईतील दोन तरुणींच्या जीवावर बेतलं; कारच्या धडकेत मृत्यू
shocking Video : Grandfather saves grandchild
Video : म्हणूनच घरात आजी-आजोबा असावेत! हिटरला हात लावायला गेला नातू, आजोबा धावत आले अन्… व्हिडीओ पाहून अंगावर काटा येईल

गाडी चालवताना डोळा लागणं किंवा अति स्पीडनं गाडी चालवणं महागात पडू शकतं. अनेक जण सलग गाडी चालवतात किंवा झोप झालेली नसतानाही गाडी चालवतात, अशावेळी अपघाताचा धोका असतो. एक छोटीशी डुलकी जीवघेणी ठरू शकते, याची प्रचिती पुन्हा एकदा आली आहे. अशा परिस्थितीत रात्रीच्या वेळी गाडी चालवत असताना काळजी घेणे खूप गरजेचे असते. कारण अनेकदा लांबचा प्रवास करत असताना चालकाला थकवा येऊन झोप येते.

अवघ्या २ सेंकदात भीषण अपघात

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या बसचा ड्रायव्हर व्हिडीओमध्ये गाडी चालवताना दिसत आहे. यावेळी तो मध्येच डुलकी घेतोय, तर मध्येच जागा होतोय. तो मधेमधे आरशात बघून बाजूच्या गाड्यांचा अंदाज घेतानाही दिसत आहे. मात्र, तरीही त्याला झोप कंट्रोल होत नाहीये. अशातच त्याला फक्त दोन सेकंदांसाठी झोप लागते आणि भीषण अपघात होतो. तो समोरच्या वाहनाला बस मागून ठोकतो. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता ही धडक किती भीषण आहे.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> VIDEO: सुसाट गाड्यांमध्ये उलट्या दिशेने आला अन् एका मागोमाग अपघातांचा थरार; मदत करायची सोडून केलं असं काही…

ब्रेक घ्या

तुमचा प्रवास लांब असल्यास, सलग अनेक तास वाहन चालवणे टाळा. तुम्ही अनेक तास गाडी चालवत असाल तर तुम्हाला जास्त थकवा येईल. तीन-चार तासांच्या ड्रायव्हिंगनंतर तुम्ही अर्धा तास ब्रेक घेतल्यास आणि तुमच्या शरीराला आराम करण्याची संधी दिली तर चांगले होईल. शक्य असल्यास, आपण आरामादरम्यान स्ट्रेचिंग व्यायामदेखील करू शकता.

गाणी ऐका

अनेकांना गाडी चालवताना गाणी ऐकायची सवय असते, त्यामुळे झोप येत नाही; म्हणून अनेक जण गाणी ऐकतात. तुम्ही एकटेच गाडी चालवत असाल आणि झोप आली असेल तर कारमध्ये गाणे ऐकले तरीही फायद्याचे आहे. गाणी ऐकण्याबरोबरच ते स्वतः म्हणा, कारण जर तुम्ही असे केले तर झोपही दूर होईल आणि तुमचा प्रवास जास्त मजेशीर होईल.

Story img Loader