Car Accident Viral Video : रस्त्यावरून प्रवास करत असताना नेहमी सतर्क असलं पाहिजे. कारण आपल्याकडून घडलेली छोटी चूक किती महागात पडेल, याचा अंदाज लावता येणार नाही. अपघातांमुळे मृत्यू झाल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. हायवेवर स्टंटबाजी करणाऱ्या लोकांचे व्हिडीओही समोर आले आहेत. मात्र, स्टंटबाजी करणं काही लोकांच्या अंगलटही आलं आहे. सोशल मीडियावर रील्स किंवा व्हिडीओ बनवण्याचा नादात काही माणसांचे भीषण अपघातही झाले आहेत. अशाच प्रकारच्या एका अपघाताचा धक्कादायक व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

एक व्यक्ती गाडी चालवत असताना एक्स्प्रेसवेवर स्टंटबाजी करण्याचा प्रयत्न करतो. पण गाडीच्या वेगावर नियंत्रण न मिळवता आल्याने त्याचा अपघाता होतो. पंजाबच्या नवांशहर-फगवारा राष्ट्रीय महामार्गावर स्विफ्ट कारचा अपघात झाला. गाडीच्या अपघाताची थरारक दृष्य कॅमेरात कैद झाली असून व्हिडीओ इंटरनेटवर प्रचंड व्हायरल झाला आहे.

नक्की वाचा – Viral Video : वाघाच्या गुहेत शिरल्यावर असच होणार! जंगल सफारी करताना तीन वाघांनी हल्ला केला अन् घडलं…

इथे पाहा व्हिडीओ

वाहनचालक एक्स्प्रेसवेवर कार चालवत असताना स्टंटबाजी करत असल्याचं या व्हिडीओ दिसत आहे. रस्त्यावरून खूप गाड्या प्रवास करत असताना तो व्यक्ती स्टंटबाजी करत असल्याचं व्हिडीओत पाहायला मिळत आहे. एका ट्वीटर युजरने या अपघाताचा व्हिडीओ शेअर केला आहे. व्हिडीओ शेअर करत कॅप्शनमध्ये म्हटलंय, रस्त्यावर वाहन चालवताना काळजी घ्या. छोट्या चुकीमुळं तुमचा मृत्यू होऊ शकतो. या व्हिडीओला सोशल मीडियावर @dreamthatworks नावाच्या युजरने शेअर केला आहे.

हायवेवर होणाऱ्या भीषण अपघातांचे व्हिडीओ इंटरनेटवर व्हायरल होताना दिसतात. पण या व्हिडीओंच्या माध्यमातून अपघात होऊ नये, यासाठी नेहमीच जनजागृती करण्याचा प्रयत्न केला जातो. वाहतुकीच्या नियमांचे पालन न केल्यावर अशाप्रकारचे अपघात घडतात. वाहतूक पोलिसांकडून अपघाताचे नियम पाळण्यासाठी चालकांना नेहमीच आवाहन केले जाते. पण काही चालक वाहने अतिवेगाने चालवून जीव धोक्यात टाकतात.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Driver was doing car stunt on expressway in few seconds terrible accident happens watch car accident shocking viral video nss