Driverless Taxi Service Video: लाइटहाऊस जर्नलिझमला सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक व्हिडिओ शेअर होत असल्याचे आढळले. हा व्हिडिओ चेन्नईमध्ये पहिल्यांदाच सुरू झालेल्या ड्रायव्हरलेस टॅक्सी सेवेचा असल्याचा दावा करण्यात आला आहे. नेमकं हे प्रकरण काय व त्याची इतकी चर्चा का सुरु आहे हे पाहूया..

काय होत आहे व्हायरल?

ट्विटर यूजर Mindhack.diva ने आपल्या ट्विटर प्रोफाइल वर व्हायरल व्हिडिओ शेअर केला.

cab driver viral video
VIDEO : टॅक्सी चालकाला पोहोचायला ७ मिनिटांचा उशीर, महिलेने घातला राडा; चालकाच्या अंगावर थुंकत म्हणाली…
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
a unique friendship between a city bus and an auto rickshaw
Video : नेहमी भांडणाऱ्या सिटी बस अन् रिक्षावाल्याचं प्रेम पाहिलं का? व्हिडीओ पाहून नेटकरी म्हणाले, “अशी मैत्री फक्त याच शहरात दिसू शकते..”
Taloja MIDC road accident
Video : तळोजातील अपघातामध्ये एक ठार, महिला अत्यवस्थ
Mother-Daughter Duo Gets Into Ugly Quarrel With Man Objecting To Wrong Parking In Delhi
VIDEO : “माझ्या १०० चुका, तरी तूच आत जाणार”, मायलेकीची तरुणाला धमकी, दिल्लीच्या रस्त्यावर पार्किंगवरून राडा
Navi Mumbai Accident
VIDEO : विरुद्ध दिशेने वाहन चालवणं नवी मुंबईतील दोन तरुणींच्या जीवावर बेतलं; कारच्या धडकेत मृत्यू
Maharashtrachi Hasya Jatra Fame Rohit Mane new car
Video : “साताऱ्याची माणसं ‘THAR’ वेडी…”, म्हणत ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम अभिनेत्याने घेतली नवीन गाडी! सर्वत्र होतंय कौतुक
Paaru
Video: “आदित्यसरांचं नाव घेते माझ्या…”, पारूने आदित्यसाठी घेतला उखाणा; सावली, लीला व तुळजाने केले कौतुक

इतर वापरकर्ते देखील असाच दावा करत व्हायरल व्हिडिओ शेअर करत आहेत.

तपास:

रिव्हर्स इमेज सर्च करण्यासाठी आवश्यक कीफ्रेम मिळवण्यासाठी आम्ही InVid टूलमध्ये व्हिडिओ अपलोड करून आमचा तपास सुरु केला.एका कीफ्रेमवर रिव्हर्स इमेज सर्च केल्यावर, आम्हाला YouTube वर दिशाभूल करणाऱ्या दाव्यासह शेअर केलेल्या व्हिडिओची मोठी आवृत्ती आढळली.

त्यानंतर आम्ही व्हिडिओच्या दीर्घ आवृत्तीवरून मिळवलेल्या कीफ्रेमवर गूगल रिव्हर्स इमेज सर्च केले. आम्हाला LinkedIn वर एक पोस्ट सापडली ज्यामध्ये व्हिडिओ सांता मोनिकाच्या रस्त्यावर Waymo च्या ड्रायव्हरलेस टॅक्सी सेवेचा असल्याचे नमूद केले आहे.

एका भारतीय तमिळ महिलेने ड्रायव्हरलेस टॅक्सीत प्रवास करण्याचा तिचा प्रत्यक्ष अनुभव शेअर केल्याचेही पोस्टमध्ये नमूद करण्यात आले आहे.

आम्हाला ब्लॅक डायमंड – प्रभू या YouTube चॅनेलवर पोस्ट केलेला व्हिडिओ देखील सापडला.

आम्ही Waymo बद्दल अधिक शोधले, जे लोकांना ड्रायव्हरलेस राइड ऑफर करते.

https://waymo.com/

आम्हाला सांता मोनिकामध्ये Waymo लाँच झाल्याची बातमी देखील मिळाली.

https://www.latimes.com/business/story/2023-10-11/waymo-driverless-taxi-launch-in-santa-monica-met-with-excitement-tension#:~:text=Waymo%20already%20offers%20fully%20driverless,and%20offer%2024%2F7%20service.

लेख ११ ऑक्टोबर २०२३ रोजी प्रकाशित झाला होता. दुसरीकडे, भारतात, बंगळुरू येथील एआय स्टार्टअप मायनस झिरोने देशातील पहिली सेल्फ-ड्रायव्हिंग कार ‘zPod’ चे अनावरण केले आहे.

https://www.wionews.com/india-news/ai-based-tech-start-up-develops-indias-first-autonomous-car-zpod-600898

निष्कर्ष: चेन्नईने आपली पहिली चालकविरहित टॅक्सी सुरू केलेली नाही. व्हायरल व्हिडीओ एका भारतीय तमिळ महिलेचा अमेरिकेत वेमो ड्रायव्हरलेस टॅक्सी सेवेबाबतचा अनुभव सांगणारा आहे.

Story img Loader