Driving Test Video : रस्त्यावर कोणतेही वाहन चालवण्यासाठी सर्वात आधी तुमच्याकडे ड्रायव्हिंग लायसन्स असणे आवश्यक असते, अन्यथा तुम्हाला रस्त्यावर वाहन चालवताना पकडल्यास दंड भरावा लागतो. पण, भारतात ड्रायव्हिंग लायसन्स मिळवण्यासाठी आधी तुमचे वय १८ वर्ष पूर्ण असणे आवश्यक असते, ड्रायव्हिंग लायसन्स मिळविणे ही फार अवघड गोष्ट आहे, त्यामुळे टेस्टमध्ये जवळपास निम्म्याहून अधिक लोक नापास होतात. कारण या टेस्टमध्ये तुम्हाला गाडी चालवताना तुमचे ड्रायव्हिंग स्किल दाखवायचे असते. दरम्यान, सोशल मीडियावर सध्या अशाच एका ड्रायव्हिंग टेस्टदरम्यानचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. या टेस्टमध्ये गाडी चालवणाऱ्या चालकासमोर अशी काही युटर्न, रिव्हर्स आणि वळणावळणाचे रस्ते दिले आहेत की जे पार करताना कोणालाही घाम फुटेल. अशी ड्रायव्हिंग टेस्ट पाहून तुम्हाला लायसन्स नकोसे वाटेल.
सध्या सोशल मीडियावर या ड्रायव्हिंग टेस्टचा एक व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. ही ड्रायव्हिंग टेस्ट भारतातील ड्रायव्हिंग टेस्टपेक्षा वेगळी आणि फार कठीण आहे. या टेस्टमध्ये चालकाला सर्व ड्रायव्हिंग कौशल्य पणाला लावावे लागत आहे. यात थोड्या हटके पद्धतीने ड्रायव्हिंग करत चालकाला अधिक आव्हानात्मक गोष्टींचा सामना करावा लागतोय, त्यामुळे ही टेस्ट पूर्ण करताना चालकाच्याही नाकी नऊ येत आहे.
अशा ड्रायव्हिंग टेस्टमध्ये ९० टक्के लोकं होतील फेल
व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, चालक कारने वळणावळणाचा रस्ता आधी पार करतो, त्यानंतर राईट टर्न घेत पुढे जातो आणि एका मोजक्याच जागेत आखलेल्या चौकोनात गाडी पार्क करतो; त्यानंतर पुन्हा तिथून कार बाहेर काढतो आणि सरळ जात एक मोठं सर्कल पार करतो. यानंतर सरळ जात पुढे रस्त्यावर ठेवलेले अडथळे पार करत जातो. यानंतर चक्क एक असं वळण येतं, जेथे चालक चक्क उलटी कार चालवतोय. या टेस्टवेळी प्रत्येक ठिकाणी काही व्यक्ती उभ्या आहेत, ज्या चालक योग्य पद्धतीने कार चालवतोय की नाही हे पाहतायत. अनेकांनी ही कठीण ड्रायव्हिंग टेस्ट असल्याचे म्हटले आहे.
हेही वाचा – पाऊल थकलं न्हाई! आजी-आजोबांचं ‘असं’ प्रेम मिळायला नशीब लागतं; VIDEO पाहून पाणावतील डोळे
या अनोख्या ड्रायव्हिंग टेस्टचा व्हिडीओ @akshaykadam1806 नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून पोस्ट करण्यात आला आहे, ज्याच्या कॅप्शनमध्ये आपल्या इथे जर अशी ड्रायव्हिंग टेस्ट घेतली तर किती पास झाले असते? असा सवाल केला आहे. दरम्यान, अनेकांनी भारतात अशी ड्रायव्हिंग टेस्ट घेतली तर सगळेच नापास होतील असे म्हटले आहे. पण, काहींनी अशी ड्रायव्हिंग टेस्ट भारतात झाली पाहिजे, असं म्हणत याने अपघात रोखण्यात मदत होईल असे मत व्यक्त केले आहे.